वैतरणा धरण परिसरात आढळला अर्धवट जळालेला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2022 01:52 IST2022-04-27T01:51:59+5:302022-04-27T01:52:16+5:30

धारगाव शिवारात वैतरणा धरणाच्या जवळ अज्ञात व्यक्तीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला आहे. राजाराम खातळे यांच्या शेताच्या परिसरात मृतदेह असल्याची माहिती मिळताच घोटीचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट देऊन तपासकार्याला सुरुवात केली. धारगावचे पोलीस पाटील लक्ष्मण बाबूराव खातळे यांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात फिर्याद दिली असून घोटी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Partially burnt body found in Vaitarna dam area | वैतरणा धरण परिसरात आढळला अर्धवट जळालेला मृतदेह

वैतरणा धरण परिसरात आढळला अर्धवट जळालेला मृतदेह

ठळक मुद्देखुनाचा गुन्हा दाखल : घोटी पोलिसांकडून वेगाने तपास सुरू

वैतरणानगर/घोटी: धारगाव शिवारात वैतरणा धरणाच्या जवळ अज्ञात व्यक्तीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला आहे. राजाराम खातळे यांच्या शेताच्या परिसरात मृतदेह असल्याची माहिती मिळताच घोटीचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट देऊन तपासकार्याला सुरुवात केली. धारगावचे पोलीस पाटील लक्ष्मण बाबूराव खातळे यांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात फिर्याद दिली असून घोटी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अज्ञात आरोपीने मयताच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने गंभीर जखम करून जीवे ठार मारले. त्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी वैतरणा धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला राजाराम खातळे यांच्या शेताच्या कोपऱ्यावर प्लास्टिकच्या गोण्या टाकून प्रेत जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. म्हणून पोलीस पाटील लक्ष्मण बाबूराव खातळे यांनी घोटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

घोटी पोलिसांनी भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखला केला आहे. घोटीचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: Partially burnt body found in Vaitarna dam area