सराफ बाजारात फिरस्त्याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 00:31 IST2019-01-20T00:30:30+5:302019-01-20T00:31:40+5:30

सराफ बाजारातील फुलबाजार येथे असलेल्या स्वच्छतागृहाजवळ अज्ञात मारेकऱ्यांनी केलेल्या जबर मारहाणीत जखमी झालेले प्रभाकर लक्ष्मण पवार या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.

Parsley market | सराफ बाजारात फिरस्त्याचा खून

सराफ बाजारात फिरस्त्याचा खून

नाशिक : सराफ बाजारातील फुलबाजार येथे असलेल्या स्वच्छतागृहाजवळ अज्ञात मारेकऱ्यांनी केलेल्या जबर मारहाणीत जखमी झालेले प्रभाकर लक्ष्मण पवार या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.
सोमवार, ७ जानेवारी रोजी रात्री अकरा वाजता सराफ बाजारातील फुलबाजार येथे असलेल्या स्वच्छतागृहाजवळ हा प्रकार घडला होता. अज्ञात मारेकºयांनी प्रभाकर लक्ष्मण पवार (३०, रा. टाकळी, ता. नांदगाव) याला काही तरी कारणातून जबर मारहाण केली. या घटनेत पवार याच्या छातीला व पोटाला मुका मार लागला होता. त्यानंतर तो स्वत: दुसºया दिवशी जिल्हा शासकीय रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल झाला; मात्र उपचार सुरू असताना शुक्रवारी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला.
मयत प्रभाकर पवार याचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून, त्यात अज्ञातांनी त्याला जबर मारहाण केल्याने अंतर्गत इजा होऊन त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाºयांनी स्पष्ट केले आहे.
जिल्हा रुग्णालयातील या शवविच्छेदन अहवालाच्या आधारे सरकारवाडा पोलिसांनी अज्ञात मारेकºयांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची तयारी चालविली आहे.

Web Title: Parsley market