शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : मतदानानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी दाखल
2
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
3
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
4
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
5
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
6
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
7
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
8
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
9
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
10
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
11
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
12
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
13
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
14
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
15
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
16
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
17
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
18
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
19
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
20
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

आठवडे बाजारानजीक रस्त्यावरच पार्किंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:41 AM

: परिसरातील गंगाघाट, हिरावाडी तसेच अयोध्यानगरी भागात बुधवारी, सोमवारी व शनिवारी भरणाऱ्या आठवडे बाजाराच्या दिवशी वाहने उभी करण्यासाठी अधिकृत जागा नसल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होते.

पंचवटी : परिसरातील गंगाघाट, हिरावाडी तसेच अयोध्यानगरी भागात बुधवारी, सोमवारी व शनिवारी भरणाऱ्या आठवडे बाजाराच्या दिवशी वाहने उभी करण्यासाठी अधिकृत जागा नसल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होते. यामुळे थेट बाजारात वाहने घुसविली जातात, तर अनेकदा रस्त्यावरच पार्किंग करण्याची वेळ ग्राहकांवर येते.बुधवारच्या दिवशी गंगाघाटावर सोमवारी हिरावाडी कमलनगर, तर शनिवारच्या दिवशी अयोध्यानगरी भागात आठवडे बाजार भरतो. या बाजारात किराणामाल भाजीपाला तसेच अन्य वस्तू खरेदीसाठी शेकडो ग्राहक येत असतात. अत्यंत दाटीवाटीने विक्रे ते भाजीबाजारात बसत असल्याने रस्त्याने पायी चालणेदेखील अवघड होते. भाजीपाला खरेदी करण्यासाठी येणारे नागरिक दुचाकी घेऊन येतात; मात्र त्यावेळी दुचाकी उभ्या करण्यासाठी वाहनतळ असल्याने दुचाकी कुठे उभ्या करायचा? असा मोठा प्रश्न निर्माण होतो. गंगाघाटावर बुधवारी भरणाºया आठवडे बाजाराच्या दिवशी बाजारात आलेल्या नागरिकांना दुकानांसमोर, तर कधी खाद्यपदार्थ विक्री करणारे हातगाड्यांसमोर दुचाकी उभ्या कराव्या लागतात.त्यामुळे अनेकदा खाद्यपदार्थ विक्री करणारे काही हातगाडीचालक नागरिकांशी वाद घालतात. बुधवारच्या बाजारात खाद्यपदार्थ विक्री करणाºया हातगाडीचालकांनी अतिक्र मण केल्याने वाहनतळाची समस्या निर्माण होते अशी तक्रार नागरिकांची आहे. अशीच परिस्थिती दर सोमवारी भरणाºया हिरावाडी कमलनगर येथील भाजीबाजाराची आहे. भाजीपाला खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना वाहने उभी करण्यासाठी जागाच नसल्याने मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावरच वाहने उभी केली जात असल्याचे चित्र बघायला मिळते. याबाबत कारवाईची मागणी होत आहे़वाहनतळ उभारण्याची मागणीदिंडोरीरोड तसेच पेठरोड परिसरातदेखील दैनंदिन भाजीबाजार भरतो रस्त्याच्या बाजूलाच भरणाºया भाजीबाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना भर रस्त्यातच वाहने उभी करावी लागतात. त्यामुळे अनेकदा अपघात होण्याची शक्यता निर्माण होते. भाजीबाजारामुळे वारंवार वाहतुकीची कोंडी होत असते. त्यामुळे या ठिकाणी वाहनतळ उभारण्याची मागणी होत आहे़

टॅग्स :Parkingपार्किंगroad safetyरस्ते सुरक्षाNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका