शाळा सुरू करण्यासाठी टाकेद विद्यालयात पालक सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 20:45 IST2021-01-24T20:44:58+5:302021-01-24T20:45:25+5:30
सर्वतिर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल टाकेद येथील पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करण्यासाठी परीसरातील पालकांची सभा विद्यालयात सकाळी अकरा वाजता उपसरपंच रामचंद्र परदेशी, रतन बांबळे, चिंधू नांगरे, प्राचार्य तुकाराम साबळे, उपप्राचार्य रमापती चौहान यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती.

शाळा सुरू करण्यासाठी टाकेद विद्यालयात पालक सभा
सर्वतिर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल टाकेद येथील पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करण्यासाठी परीसरातील पालकांची सभा विद्यालयात सकाळी अकरा वाजता उपसरपंच रामचंद्र परदेशी, रतन बांबळे, चिंधू नांगरे, प्राचार्य तुकाराम साबळे, उपप्राचार्य रमापती चौहान यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती.
शासनाच्या आदेशान्वये बुधवारी ( दि.२७) पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होणार आहेत. यासाठी पुर्व तयारी म्हणून आयोजित केलेल्या सभेसाठी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्राचार्य तुकाराम साबळे यांनी मुलांना शाळेत पाठवताना मास्क, सॅनिटायझर बाटली, पाण्याची बाटली घरून घेऊन येणे बाबत सुचना करण्यात आल्या. शाळा सुरू होण्या अगोदर पालक व विद्यार्थी यांनी हमीपत्र लिहून देणे बंधनकारक असल्याचे व हमीपत्राशिवाय शाळेत प्रवेश मिळणार नाही असेही सांगण्यात आले.
सद्या नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरु आहेत. एका बेंचवर एक विद्यार्थी या प्रमाणे बैठक व्यवस्था असून प्रत्येक विद्यार्थी एक दिवसाआड शाळेत येत आहेत व शिक्षण घेत आहेत. या वेळी गेटवरच प्रत्येक विद्यार्थ्याचे तापमान वऑक्सीमिटरने ऑक्सिजन लेवलची तपासणी केली जाते. याच प्रमाणे पांचवीं ते आठवी च्या मुलांचीही काळजी घेतली जाणार आहे रविवारी व सोमवारी ग्रामपंचायत च्या सहकार्याने सर्व वर्ग खोल्या व परीसराचे निर्जंतुकिकरण केले जाणार आहे. यासाठी सरपंच ताराबाई बांबळे व उपसरपंच रामचंद्र परदेशी यांनी सहकार्य करण्याचे कबुल केले.
यासभेवेळी वेणूबाई गवारी, ज्योती गायकवाड, आश्विनी आगलावे, बाळू बांबळे, बाळू केवारे, तुकाराम साबळे, पोटे, विलास खापरे, राजेंद्र गायकवाड, संजय धादवड, मनोज चव्हाण, गोरखनाथ जोशी, राजाराम कोळी, राजेंद्र राठोड, किरण चौरे, निलेश माकोणे, उल्हास वराडे आदी उपस्थित होते.
(२४ टाकेद)
पालक सभेवेळी मार्गदर्शन करताना रामचंद्र परदेशी, रतन बांबळे, तुकाराम साबळे, रमापती चौहान, चिंधू नांगरे.