Pankaja Munde Challenge to Sharad pawar comes and stands in election in Beed Says Pankaja Munde | बीडमध्ये स्वत: शरद पवार येऊन उभे राहिले तरी कमळ फुलेल - पंकजा मुंडे 

बीडमध्ये स्वत: शरद पवार येऊन उभे राहिले तरी कमळ फुलेल - पंकजा मुंडे 

नाशिक - महाजनादेश यात्रेच्या समारोपावेळी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शरद पवारांना आव्हान दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने बीडमधून राजकारणाला सुरुवात केली. बीड जिल्ह्यातले उमेदवार घोषित केले. मात्र खुद्द शरद पवार स्वत: बीडमधून उभे राहिले तरी कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. 

या भाषणात पंकजा मुंडे यांनी सांगितले की, मोदी हे गोरगरिबांचे स्वप्न आहे. राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेस ला नेस्तनाबूत करण्याचा निर्धार करावा. जातीपातीचे विष महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसने पेरलं. पंतप्रधान मोदींनी सामाजिक स्वच्छतेचं काम केलं असं त्यांनी सांगितले. 

राष्ट्रवादीने 5 उमेदवारांची घोषणा केली त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या की,  मला आगामी निवडणुकांची अजिबात धास्ती नसून आमच्या विरोधकांनीच त्याची धास्ती घेतल्याचं दिसून येतंय, असे पंकजा यांनी म्हटले आहे. परळी विधानसभेतून माझाच विजय निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.   

मी परळीत निवडूण आलेली आमदार आहे, मला कुठेही धास्ती वाटायंच काम नाही. लोकसभा निवडणुकांवेळी राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला असून माझ्या विधानसभा मतदारसंघातही ते मायनसमध्ये आहेत. मी गेल्या 5 वर्षात मोठा निधी मतदारसंघात आणला असून जिल्ह्यात अनेक विकासकामे केली आहेत. त्यामुळे परळीतून यंदाही मीच विजयी होणार, असा विश्वास पंकजा यांनी बोलून दाखवला. तसेच निवडणुकीची धास्ती मला नाही, तर त्यांनाच वाटायल्याची दिसून येतंय. कारण, ज्या पद्दतीने ते कामाला लागले आहेत, त्यावरुन ते स्पष्टच दिसतंय, असेही पंकजा यांनी म्हटलं आहे.  
 

Web Title: Pankaja Munde Challenge to Sharad pawar comes and stands in election in Beed Says Pankaja Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.