भादवण परिसरात बिबट्याची दहशत ग्रामस्थ भयभीत : वनविभागाकडे तातडीने पिंंजरा लावण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:13 IST2018-04-27T00:13:44+5:302018-04-27T00:13:44+5:30
पिळकोस : कळवण तालुक्यातील भादवण परिसरात बिबट्याच्या हल्ल्यांनी ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. गव्हाळी शिवारात गुरुवारी पहाटे मेंढपाळाच्या शिंगराचा बिबट्याने फडशा पाडला.

भादवण परिसरात बिबट्याची दहशत ग्रामस्थ भयभीत : वनविभागाकडे तातडीने पिंंजरा लावण्याची मागणी
पिळकोस : कळवण तालुक्यातील भादवण परिसरात बिबट्याच्या हल्ल्यांनी ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. गव्हाळी शिवारात गुरुवारी पहाटे मेंढपाळाच्या शिंगराचा बिबट्याने फडशा पाडला असून, मोकाट बिबट्याला पकडण्याचे आव्हान वनविभागासमोर उभे ठाकले आहे. भादवण येथील माजी उपसरपंच व्यंकट शंकर जाधव यांच्या गव्हाळी शिवारातील गट नं. २०७ मधील शेतात कांदा पात चरण्यासाठी आलेल्या मेंढपाळाच्या कळपातील दोन वर्षाच्या शिंगरावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शिंगराचा मृत्यू झाला. दि. २५ ला रात्री २ च्या सुमारास व्यंकट शंकर जाधव यांच्या पिळकोस-बगडू पुलाजवळील गवाळी मळ्यातील शेतात टिपे, ता. मालेगाव येथील मेंढपाळ धनराज अण्णा ठोंबरे हे तळ ठोकून होते. रात्री २ वाजता बिबट्याने मेंढपाळाच्या कळपातील मोकळ्या असणाऱ्या शिंगरावर अचानक हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने मेंढ्या बिथरल्याने मेंढपाळ जागे झाले; मात्र या मेंढपाळाचे शिंगरू
बिबट्याने ओढून नेऊन फस्त केले. बिबट्याच्या धाकाने मेंढपाळानी ती रात्र जागून काढली. नागरिकांमध्ये यामुळे घबराट पसरली आहे.