पिळकोस शिवारात बिबट्याची दहशत
By Admin | Updated: July 14, 2017 00:39 IST2017-07-14T00:34:14+5:302017-07-14T00:39:32+5:30
पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस शिवारात बिबट्याने शेळ्या, मेंढ्यांवर हल्ला चढविल्या

पिळकोस शिवारात बिबट्याची दहशत
लोकमत न्यूज नेटवर्क
पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस शिवारात बिबट्याने शेळ्या, मेंढ्यांवर हल्ला चढविल्यानंतर परिसरात पशुपालकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे, घबराट निर्माण झाली आहे.
भादवण परिसरात दाट झाडी असून, जाळीदार झाडांचे जंगल असल्याने भादवण गाव परिसर बिबट्याचे आश्रय स्थान होऊन बसले आहे. दाट झाडी, पाण्याची सोय असल्याने बिबट्यांचा संचार वाढला असून, कैलास जाधव यांच्या पशुधनाचे बिबट्याकडून सर्वाधिक नुकसान झाले आहे. जाधव यांच्या घराशेजारी दोनदा पिंजरा लावून वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यास यश मिळवले आहे.