धावत्या व्हॅनने पेट घेतल्याने घबराट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:36 IST2018-04-08T00:36:12+5:302018-04-08T00:36:12+5:30
नांदगाव : नांदगाव-मनमाड रोडवर हिसवळजवळ धावत्या मारुती व्हॅनने पेट घेतल्याची घटना शुक्र वारी (दि. ६) रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली.

धावत्या व्हॅनने पेट घेतल्याने घबराट
नांदगाव : नांदगाव-मनमाड रोडवर हिसवळजवळ धावत्या मारुती व्हॅनने पेट घेतल्याची घटना शुक्र वारी (दि. ६) रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. गाडी गॅसवर चालणारी असल्याने आग लागताच सिलिंडरचा स्फोट होऊन गाडी जळून खाक झाली. गाडीमालक विठोबा महाजन व चालक गणेश खैरनार (रा. मांदर्णे सायगाव, ता. चाळीसगाव) यांच्या तीन महिला प्रवास करत होते. आग लागताच प्रसंगावधान राखून सर्व जण गाडीच्या बाहेर पडल्याने त्यांचे प्राण वाचले. गाडीला आग लागल्यानंतर या मार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूला थांबविण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच मनमाड येथून अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी रवाना होऊन, त्यांनी एक तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली; मात्र तोपर्यंत गाडी पूर्णपणे जळाली होती. गाडी मनमाडची असल्याचे समजते. नांदगाव पोलिसांनी घटनास्थळी
धाव घेऊन प्रवाशांना मदत केली.