चुरशीच्या लढतीत पांगरकर विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 01:15 IST2021-01-20T21:31:42+5:302021-01-21T01:15:46+5:30
पांगरी : सिन्नर तालुक्यातील पांगरी खुर्द येथील वॉर्ड क्रमांक ३ मध्ये एका जागेसाठी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर यांचे चिरंजीव विशाल पांगारकर तसेच सोसायटीचे संचालक कैलास शिंदे यांच्यात चुरशीची लढत झाली. त्यात विशाल पांगारकर हे ५० मते मिळवून विजयी झाले.

चुरशीच्या लढतीत पांगरकर विजयी
कैलास शिंदे यांना ४२ मते मिळाली. सात जागेसाठी १२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. परंतु माघारीच्या दिवशी चार उमेदवारी अर्ज माघारी घेण्यात आल्याने सहा जागा बिनविरोध झाल्या. बिनविरोध निवड झालेले वॉर्डनिहाय उमेदवार पुढीलप्रमाणे : वार्ड क्रमांक १ श्रीकृष्ण मारुती घुमरे, अनिता शंकर शिंदे, आशादेवी सर्जेराव सालके, वार्ड क्रमांक २ संदीप शिंदे, द्वारकाबाई शिंदे, वार्ड क्रमांक ३ नीता प्रदीप नेहे यांचा समावेश आहे.