नाशिक जिल्हा वकील फेडरेशनच्या अध्यक्षपदी पंडितराव भदाणे यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 06:05 PM2020-01-16T18:05:29+5:302020-01-16T18:08:06+5:30

सटाणा : नाशिक जिल्हा वकील फेडरेशनच्या अध्यक्षपदी बागलाण तालुका वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. पंडितराव भदाणे यांची बहुमताने निवड करण्यात आली.

Panditrao Bhadane elected president of Nashik District Lawyers Federation | नाशिक जिल्हा वकील फेडरेशनच्या अध्यक्षपदी पंडितराव भदाणे यांची निवड

नासिक जिल्हा वकील फेडरेशनच्या जिल्हा अध्यक्षपदी सटाणा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड . पंडीतराव भदाणे यांची निवड झाल्याने सटाणा येथे आयोजित सत्कार समारंभाप्रसंगी सटाणा न्यायालयाचे दिवानी न्यायाधीश व्ही. ए. आव्हाड, न्यायाधिश ए. जी. तांबोळी, अ‍ॅड. पंडीतराव भदाणे, सरकारी वकील सपकाळ आदींसह उपस्थित वकील बांधव.

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यातील पिहल्या नाशिक जिल्हयाच्या फेडरेशनची स्थापना

सटाणा : नाशिक जिल्हा वकील फेडरेशनच्या अध्यक्षपदी बागलाण तालुका वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. पंडितराव भदाणे यांची बहुमताने निवड करण्यात आली.
निफाड येथे नुकत्याच झालेल्या जिल्ह्यातील सर्व वकील संघांच्या अध्यक्षांच्या बैठकीत ही निवड झाली असून राज्यातील पिहल्या वकील फेडरेशनच्या जिल्हाध्यक्षपदी निवड होण्याचा बहुमान अ‍ॅड.भदाणे यांनी मिळविला आहे.
बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्या भावी कार्यक्र मानुसार सर्व जिल्ह्यांमध्ये विकलांची फेडरेशन स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील पिहल्या नाशिक जिल्हयाच्या फेडरेशनची स्थापना करण्यात आली.
बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवाचे अध्यक्ष अ‍ॅड. अविनाश भिडे व माजी अध्यक्ष अ‍ॅड. जयंत जायभावे उपस्थित होते.
बैठकीत जिल्ह्यातील सर्व वकील संघांच्या अध्यक्षांनी जिल्हाध्यक्षपदी अ‍ॅड.पंडितराव भदाणे यांच्या नावावर सर्वानुमते मंजूरी दिली. अ‍ॅड.भिडे व अ‍ॅड.जायभावे यांच्या हस्ते भदाणे यांचा सत्कार करण्यात आला.
बार कौन्सिलला सहाय्यभूत राहील आणि बार कौन्सिलचे कार्यक्र म तालुका पातळीवर नेण्यासाठी सक्षम फेडरेशनची गरज आहे. जलद न्याय आणि न्यायसंस्थेचे विकेंद्रीकरण या विषयांना चालना देण्यासतही फेडरेशन कार्यरत राहील. नाशिक जिल्ह्याने राज्यात सर्वात प्रथम फेडरेशन स्थापन करून राज्यात एक आदर्श निर्माण केल्याचे अ‍ॅड. भिडे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे, नाशिकरोडचे अध्यक्ष अ‍ॅड. सुदाम गायकवाड, इगतपुरीचे अध्यक्ष अ‍ॅड. संजय जाधव, निफाडचे अ‍ॅड. अंबादास आवाडे, चांदवडचे अ‍ॅड. दिनकर ठाकरे, मालेगावचे अध्यक्ष अ‍ॅड. आर. के. बच्छाव, कळवणचे अध्यक्ष अ‍ॅड. संजय पवार आदींसह सर्व तालुक्यांच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष उपस्थित होते.

Web Title: Panditrao Bhadane elected president of Nashik District Lawyers Federation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.