पंडित प्रदीप मिश्रा त्रंबकेश्वराच्या दरबारात नतमस्तक !

By Suyog.joshi | Updated: November 23, 2023 10:58 IST2023-11-23T10:57:55+5:302023-11-23T10:58:04+5:30

पंडित मिश्रा यांनी त्र्यंबकेश्वरची अभिषेक पूजन आरती केली. यावेळेस मोठ्या संख्येने त्यांचे भक्तगण उपस्थित होते.

Pandit Pradeep Mishra bowed down in the court of Trambakeshwar! | पंडित प्रदीप मिश्रा त्रंबकेश्वराच्या दरबारात नतमस्तक !

पंडित प्रदीप मिश्रा त्रंबकेश्वराच्या दरबारात नतमस्तक !

नाशिक  : प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी आज बारा ज्योतिर्लिंगपैकी एक असलेल्या त्रंबकेश्वरच्या दर्शनाचा लाभ घेतला. मंदिर गर्भ गृहात पंडित मिश्रा त्र्यंबकेश्वराच्या दरबारात नतमस्तक झाले. ब्रह्मा, विष्णू महेश या तीन देवतांचे, शिवलिंगांचे दर्शन झाल्याने पंडित मिश्रा कृतार्थ  झाल्याचे दिसून आले.  त्यांच्या समवेत आलेले पालकमंत्री दादा भुसे, सतीश महाले यांची उपस्थिती होती. 

पंडित मिश्रा यांनी त्र्यंबकेश्वरची अभिषेक पूजन आरती केली. यावेळेस मोठ्या संख्येने त्यांचे भक्तगण उपस्थित होते. येथील पुरोहित अमित देवकुटे ,त्रंबकेश्वरचे पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे, तसेच सहकारी चांदवडकर यांनी पूजा पौरोहित्य केले. त्रंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त स्वप्निल शेलार ,सौ भुतडा यांनी ट्रस्टच्या वतीने, तसेच तुंगार  ट्रस्टच्या वतीने तुंगार बंधूंनी पंडित प्रदीप मिश्रा  यांचे स्वागत केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात होता.
 

Web Title: Pandit Pradeep Mishra bowed down in the court of Trambakeshwar!

टॅग्स :Nashikनाशिक