शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पांडवलेणीचे बहरले सौंदर्य

By admin | Updated: July 31, 2016 00:47 IST

पावसाळी सहली : पर्यटकांना भुरळ

नाशिक : पावसामुळे शहराचे महत्त्वाचे ऐतिहासिक पर्यटनस्थळ असलेल्या त्रिरश्मी लेणीचे (पांडवलेणी) सौंदर्य अधिकच बहरले आहे. हिरवाईचे कोंदण लाभलेल्या पांडवलेणीच्या पायऱ्या चढताना जणू निसर्गाने पर्यटकांच्या स्वागतासाठी ‘ग्रीन कार्पेट’ आच्छादून ठेवले आहे की काय, असा भास न झाल्यास नवलचं! पावसाळ्यातील पांडवलेणीचे सौंदर्य डोळ्यांत साठविण्यासाठी पर्यटक सहकुटुंब मोठ्या संख्येने येथे येत आहे.रिमझिम पाऊस आणि डोंगरावरून कोसळणारे धबधबे याचे अद्भुत दृश्य पहावयास मिळते. लेणीवर हिरवळ दाटली असून, परिसरातील वृक्षराजीही बहरल्यामुळे पर्यटकांना भुरळ पडली आहे. लेणीवरील काही कुंडांमध्ये पाणी साचल्याने बेडकांचे संगीतही आलेल्या पर्यटकांच्या कानी पडत आहे.आबालवृद्ध वीकेण्डसाठी पांडवलेणी परिसराची निवड करताना दिसून येत आहे. शनिवार, रविवार येथे नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. पावसाच्या हलक्या व मध्यम सरी अंगावर झेलत गरम-गरम मकईचे कणीस खात पर्यटक निसर्गाच्या हिरव्यागार मंडपातून पायऱ्या चढण्याचा आनंद लुटत आहे. एरवी उन्हाळ्यात लेणीच्या पायऱ्या चढताना अधिक दमछाक होते व उष्म्याचा त्रासही जाणवतो. मात्र आता थंड वातावरणात हिरवाईच्या लाभलेल्या कोंदणामुळे आल्हाददायक ट्रेक पर्यटक करत आहे. पांडवलेणीवर गेल्यानंतर शहराचे विहंगम दृश्य बघून पर्यटक आश्चर्यचकित होत आहेत. ‘आपलं नाशिक एवढं वाढलं’ असे उद्गार यावेळी सहज कानी पडतात. चोहोबाजूंनी गर्द हिरवाईने नटलेले बुध्द स्मारक पर्यटकांच्या सेल्फी फोटोसेशनचे मुख्य आकर्षण केंद्र आहे. लेणीच्या रेलिंगजवळ सुरक्षित उभे राहून नागरिक बुध्द स्मारकासोबत सेल्फी काढतात. २४ गुहांची मिळून ही एक लेणी आहे. अप्रतिम दगडी नक्षीकाम आणि डोंगरामध्ये कोरलेल्या गुहा हे या लेणीचे मुख्य वैशिष्ट्य. सध्या लेणी भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित आहे. येथील उत्कृष्ट मूर्तीकला डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाकडून लेणीमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रौढांकडून प्रत्येकी पंधरा रुपये शुल्क आकारले जाते.