शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

पंचवटी परिसरात सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:57 AM

परिसरात गेल्या आठवडाभरापासून सर्दी, खोकला तसेच तापाच्या रुग्णांत वाढ झाल्याने नागरिक भयभीत झालेले आहेत. रुग्णांची संख्या वाढतच चालल्याने परिसरातील रुग्णालयांत उपचारासाठी रुग्णांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र दैनंदिन दिसून येत आहे.

पंचवटी : परिसरात गेल्या आठवडाभरापासून सर्दी, खोकला तसेच तापाच्या रुग्णांत वाढ झाल्याने नागरिक भयभीत झालेले आहेत. रुग्णांची संख्या वाढतच चालल्याने परिसरातील रुग्णालयांत उपचारासाठी रुग्णांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र दैनंदिन दिसून येत आहे. एक वर्षाच्या बालकापासून ते ७० वर्षांच्या वयोवृद्धापर्यंत सध्या सर्वांनाच खोकला तसेच सर्दी या आजाराने ग्रासलेले असल्याने पंचवटीत तरी सध्या घराघरात एक तरी सर्दी तसेच खोकल्याचा रुग्ण आढळून येत आहे. सर्दी-खोकल्याची साथ असल्याने दिवसेंदिवस परिसरात रुग्णांची संख्या वाढत आहे.सलग तीन ते चार दिवसांपासून सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. सर्दी, खोकला, डोकेदुखी यामुळे नागरिक रक्त, लघवी तपासून मलेरिया किंवा अन्य साथीच्या आजाराची लागण तर झालेली नाही ना याची खात्री करून घेत आहेत. सध्या गणेशोत्सवाचे दिवस असल्याने सर्वत्र नागरिकांची गर्दी होत आहे त्यातच खोकला, सर्दी यामुळे साथीचे आणखी आजार पसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर वातावरणात अचानकपणे बदल होऊन त्याचा परिणाम शरीरावर झाल्यानेच सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले असल्याचे डॉक्टरांकडून सांगितले जात आहे.  सध्या डेंग्यू तसेच स्वाइन फ्लूसदृश आजाराची लागण मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे गर्दीत जाणे टाळावे, कुठल्याही कार्यक्रमास गरज असल्यासच जावे. बोलताना साधारण प्रत्येकात एक मीटर अंतर पाहिजे. रुग्णाला खोकला आला तर तोंडातून इन्फेक्शन बाहेर जाण्याची शक्यता असते. महत्वाचे म्हणजे प्रत्येकवेळा साबणाने कोमट पाण्यात हात स्वच्छ धुवावेत. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी दैनंदिन व्यायाम करावा. रूग्णाने वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत. - डॉ. अरुण गुंजाळ

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल