पंचवटीमधून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 15:00 IST2017-07-30T14:58:50+5:302017-07-30T15:00:11+5:30

पंचवटी परिसरातील हिरावाडी व म्हसरूळ परिसरातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे

pancavataimadhauuna-daona-alapavayaina-maulaincae-apaharana | पंचवटीमधून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण

पंचवटीमधून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण

ठळक मुद्देमखमलाबादरोडवरून एका सोळा वर्षीय मुलीला अज्ञात इसमांनी फूस लावून पळवून नेल्याची फिर्यादपंचवटी व म्हसरुळ पोलीसांकडून या मुलींचा शोध

नाशिक : पंचवटी परिसरातील हिरावाडी व म्हसरूळ परिसरातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पंचवटी व म्हसरुळ पोलीसांकडून या मुलींचा शोध घेतला जात आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मखमलाबादरोडवरून एका सोळा वर्षीय मुलीला अज्ञात इसमांनी फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद म्हसरुळ पोलीस ठाण्यात अपह्रत मुलीच्या आईने दिली आहे. तसेच हिरावाडी परिसरातून तांबोळी नगरमधून एका सतरा वर्षीय मुलीला भर रस्त्यावरुन अज्ञात इसमांनी फूस लावून कायदेशीर रखवालीतून पळवून नेल्याची फिर्याद मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात दिली आहे. दोन्ही अपह्रत मुलींचे शुक्रवारी (दि.२८) अपहरण झाल्याची नोंद पोलीसांकडे आहे. याबाबत दोन्ही पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक व सहायक पोलीस निरिक्षक तपास करीत आहेत.

Web Title: pancavataimadhauuna-daona-alapavayaina-maulaincae-apaharana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.