शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
7
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
8
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
9
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
10
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
11
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
12
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
13
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
14
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
15
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
16
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
17
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
18
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
20
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानला धडा शिकवायलाच हवा

By admin | Updated: September 4, 2016 01:16 IST

अनुराधा गोरे : सियाचेनसंबंधी त्रुटींविषयी व्यक्त केली खंत

नाशिक : पाकिस्तान आणि चीन यांसारखे शेजारी असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सियाचेनमधून सैन्य काढून घेणे अशक्य असून, या भागात गेल्या ३४ वर्षांपासून सातत्याने सुरू असलेले आॅपरेशन मेघदूत गिलगिटवर ताबा मिळवून संपवणे शक्य आहे. त्यासाठी पाकिस्तानला धडा शिकवून बाल्टिस्तानातील हा भाग काबीज करणे आवश्यक असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक अनुराधा गोरे यांनी व्यक्त केले. शंकराचार्य न्यास आणि ज्योती स्टोअर्स यांच्या संयुक्त ‘लेखक तुमच्या भेटीला’ उपक्रमांतर्गत ज्येष्ठ साहित्यिक नीलिमा गोरे यांनी लघुपट आणि चित्रफितीच्या साह्याने सियाचेनची ओळख करून दिली. यावेळी त्यांनी शैक्षणिक अभ्यासक्रम आणि साहित्यातील सियाचेनविषयी अल्पसमावेश आणि चुकीच्या माहितीविषयी खंत व्यक्त केली. तसेच सियाचेनचा सियाचीन असा करण्यात येणारा उल्लेख चुकीचा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. व्यासपीठावर सुदेश हिंगलासपूरकर, वसंत खैरनार व राजाभाऊ मोगल उपस्थित होते. गोरे म्हणाल्या, सियाचेनवर भारताचे सैनिक रोज मृत्यूशी झुंजत असताना अनेक जवानांना प्राण गमवावे लागले आहे. सियाचेनच्या शरीर गोठवून टाकणाऱ्या थंडीविषयी माहिती देताना या युद्धभूमीवर लढण्यासाठी जगाच्या पाठीवर कोणत्याही देशाने शस्त्र तयार केले नसल्याचे सांगताना येथे केवळ भारतीय जवानांच्या शौर्याच्या जोरावर सर्व प्रमुख खिंडी आणि हिमकडे भारतीय सैन्याच्या हातात असल्याचे त्यांनी सांगितले. ते सोडले, तर कारगिलमधील धड्यानुसार पाकिस्तानसारखा दगाबाज शेजारी तिथले मोर्चे बळकावू शकतो आणि तिथून त्यांना हाकलणे दुरापास्त होईल. तसेच सियाचेनमार्गे पाकिस्तान व चिनी सेना एकमेकांशी मेळ घालू शकतात. त्यामुळे भारताला कोणत्याही परिस्थितीत सियाचीन सोडणे शक्य नसल्याचे सांगतांना गिलगिट ताब्यात घेऊन सियाचिनचे रक्षण करणे हा सियाचिन समस्येवर पर्याय असल्याचे गोरे म्हणाल्या. (प्रतिनिधी)