शहरातील खड्डे भरण्यासाठी महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करून मुरूम टाकला जात आहे, मात्र दोनच दिवसांत खड्डे बुजवण्यासाठी टाकलेला मुरूम पुन्हा रस्त्यावर आला असून, त्यामुळे अपघात वाढले आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा खर्च खड्ड्यात गेल्याचा आरोप भाजपच्या ...
अंबड भागातील खालचे चुंचाळे येथील एका तरुणाला टोळक्याकडून लोखंडी सळईने बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना सोमवारी (दि. २०) सकाळी पावणेअकरा वाजेच्या सुमारास घडली. ...
जिल्हा शासकीय रुग्णालयातील कर्मचारी अशोक पुंडलिक दराडे यांनी सोमवारी (दि. २०) साडेपाच वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ...
आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंंडावर संघटनेला बळकटी आणण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर पक्षाचे ब्रॅण्ड ॲम्बेसेडर म्हणजेच शाखाध्यक्ष नियुक्त करण्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रस्ताव अंतिम झाला असून बुधवारी (दि. २२) नाशिक दौऱ्यावर येणारे राज ठाकरे त्या ...
पितृपक्ष सुरू झाल्याने नैवेद्यासाठी लागणाऱ्या विविध भाज्यांची मागणी देखील वाढली आहे. त्यामुळे अळू, भेंडी, गवार, डांगर आदी भाज्यांचे दर वाढण्यास सुरू झाली आहे. ...
मुक्या जनावरांना इंजेक्शन देत बेशुद्ध करत गोवंश चोरी करणाऱ्या टोळीतील एका संशयिताला इगतपुरी पोलिसांनी वाहनासह अटक केली असून, बाकीचे पाच जण फरार झाले आहेत. याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मालेगाव तालुक्यातीळ साकुरीला आज मंगळवारी झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे नदीला पुन्हा महापूर आला. गेल्या आठवड्यात आलेल्या पुराच्या संकटातून सावरत नाही. तेवढ्यात पुन्हा साकोरी गावात व परिसरात मोठ्या प्रमाणावर ढगफुटीसदृश पर्जन्यवृष्टी झाली. त्यातून गाव न ...
इगतपुरी तालुक्यात कथित आश्रमशाळा भरतीप्रकरणी संस्थेच्या अध्यक्षांनी समाज कल्याण विभागाच्या वतीने परवानगी नसताना भरतीसाठी मुलाखतीला बोलाविल्याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्ह्या दाखल करून संस्थेच्या अध्यक्षांना अटक करण्यात आली होती. याप्र ...
उमराणे येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल पावसाळी कांद्यांसह चालू हंगामातील नवीन मका विक्रीस आला असून, कांद्यास सर्वोच्च २१२१ रुपये, तर मक्यास १८७१ प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला आहे. ...
शासकीय हिशेबानुसार पावसाळा संपायला केवळ नऊ दिवस शिल्लक असताना जिल्ह्यातील पेठ, मालेगाव, नांदगाव व देवळा या चार तालुक्यांनी पर्जन्याच्या टक्केवारीत शंभरी पार केली असून, अकरा तालुके सरासरीपर्यंतदेखील पोहोचू शकले नाहीत. दरम्यान, गतवर्षी जून ते सप्टेंबर ...