मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी थेट खरेदीने जागा देऊन पाचपट मोबदलाचा लाभ मिळविण्यासाठी शेवटचे तीन दिवस शिल्लक असल्यामुळे इगतपुरी तालुक्यातील शेतकºयांनी हेवेदावे बाजूला ठेवून जमिनीची संमती देण्यासाठी तहसील, प्रांत कार्यालयात रीघ लावली आहे. ...
शासनातर्फे आदर्श शिक्षक तसेच सावित्रीबाई फुले आदर्श स्त्री शिक्षिका पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये ३८ प्राथमिक, ३९ माध्यमिक, १८ आदिवासी क्षेत्रामधील, दोन विशेष, एक अपंग, एक स्काउट व गाइड शिक्षक यांचा समावेश आहे ...
नैताळे व परिसरातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींना बसमध्ये प्रवेश न देणे, बसेस थांब्यावर न थांबवता रस्त्यावर कुठेही थांबवणे आदी विविध समस्या सोडविण्यासाठी नैताळे येथे निफाड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र बोरगुडे ...
जिल्ह्णात सटाणा तालुक्यातील उत्राणे येथील दिव्यांग तरुण प्रवीण कडू पगार या दिव्यांग तरुणास आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या बँक कर्मचाºयांविरोधात तत्काळ कारवाई करण्यासह, मराठा विद्यार्थी वसतिगृहाच्या कामाला वेग देण्यासाठी प्रशासनाला आदेशित करण्याच्या सूच ...
वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याचे सभासद व कामगारांचे हक्क अबाधित ठेवून कारखाना भाडेतत्त्वावर खासगी व्यापाऱ्यास चालविण्यास देण्यात यावा, असा ठराव मंगळवारी (दि २८) वसाका कार्यस्थळावर झालेल्या विशेष सभेत मांडण्यात आला. त्यास उपस्थित सर्व सभासद व का ...
करवाढीच्या मुद्द्यासह कार्यपद्धती आणि वागणुकीवरून भाजपाने लक्ष केलेले आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्वास ठरावाला केवळ राजकीय पक्षच नव्हे तर शेतकरी आणि व्यावसायिक संघटनांचा पाठिंबा मिळवण्यासाठी यापक्षाचे पदाधिकारी सरसावले असून, अविश्वास ठरा ...
शहरातील ७१ धार्मिक स्थळे हटविण्याच्या विरोधात उच्च न्यायालयाकडून याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा मिळाला नसून आता पुढील सुनावणी ३० आॅगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे. ...
फुलेनगर परिसरातील कालिकानगर येथे राजरोसपणे चालणाऱ्या गावठी हातभट्टीची दारू तयार करणाºया अड्ड्यावर पंचवटी पोलिसांनी मंगळवारी (दि.२८) सकाळी छापा मारला़ याठिकाणी असलेले १९ हजार रुपये किमतीचे गावठी दारू बनविण्यासाठी ...
शहरात एकूण चारशे सुलभ शौचालये, त्यातील १५३ शौचालये सुलभ संस्थेला दिलेली. महापालिकेने शोध घेतला तेव्हा कंत्राटानुसार १५३ पैकी १२३ शौचालये आढळले आहेत. तीस शौचालय बेपत्ता झाली असून, त्याचा शोध महापलिका घेत आहेत. ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास ठरावास अनेक कारणे असले तरी सत्तारूढ भाजपाने करवाढ हा मुद्दा कळीचा केला असून, आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयामुळे पूर्वी दोन हजार रुपये घरपट्टी असेल तर ती आता १२ हजारांवर येईल, अशी माहिती दिली आहे. ...