पॉवर-सिग्नल ब्लॉक, इंटर लॉकिंग व इगतपुरी रेल्वेस्थानक यार्डमधील रिमोल्डिंगच्या कामामुळे गुरुवारी घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे गोदावरी व भुसावळ पॅसेंजर रद्द करण्यात आली. ...
पुणे महामार्गावरील शिंदे गावात असलेल्या गोडंबा नदीवरील बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या तुंगार गल्लीतील एका १८ वर्षीय तरु णाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ...
लेखानगर येथील साई प्लाझा कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या छतावर बिल्डरने भाडेतत्त्वावर सुरू केलेले विविध मोबाइल कंपन्यांचे टॉवर महापालिकेने कारवाई करीत सील केले. ...
पिंपळगाव खांब-वडनेर गेट रस्त्यावरून भरधाव वेगाने दुचाकीवरून जात असताना अचानकपणे रस्त्यावरून कुत्रा आडवा पळाल्याने दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले. वाहन घसरून दुचाकीस्वाराला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. ...
नाशिक-पुणे हायवेवरील शिंदे-पळसे टोलनाक्याजवळ गॅस भरलेल्या टँकरमधून गॅस गळती होत असल्याचे लक्षात आल्यानंतर झालेली धावपळ.. गॅस गळती थांबविण्यासाठी सिन्नर आणि परिसरातून सायरन वाजवत आलेली आपत्कालीन यंत्रणा... त्यानंतर हे मॉकड्रिल (रंगीततालीम) असल्याचे सम ...
जिल्हा सत्र न्यायालयाचा आवार सुरक्षित करण्याच्या हेतूने न्यायालयाच्या आवारात विनाकारण कायदासुव्यवस्थेला तडा देण्याच्या उद्देशाने वावरणाऱ्या संशयितांची धरपकड पोलिसांनी दुसºया दिवशी गुरुवारी (दि.११) सुरूच ठेवली. उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या नेतृत ...
गांधीनगर येथे रामलीलेचे उद्घाटन खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते झाले. यावेळी रामलीलाचे अध्यक्ष कपिल शर्मा, मनोहर बोराडे आणि कलाकारांसह मान्यवर उपस्थित होते. ...
शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे अध्यापनाचे काम करतानाच अध्ययनही करणे आवश्यक असल्याने प्राध्यापकांचा वेगवेगळ्या स्तरावर ज्ञान आणि कौशल्य विकास साधण्याच्या उद्देशाने विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) व विद्यापीठाकडून उजळणी वर्ग (रिफ्रेशर ...
महानगरपालिकेच्या वतीने नाशिक शहरातील पाचशेहून अधिक धार्मिक स्थळांना बेकायदा ठरवून नोटिसा बजावलेल्या आहेत. नाशिक शहराची ओळख मंदिरांचे शहर असून, शहराची ओळख पुसण्याचे काम प्रशासन करत आहे. प्रशासनाच्या विरोधात न्यायालयीन लढ्यासाठी सर्व धर्मियांच्या संघटन ...