मंत्री छगन भुजबळ हे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने छत्रपती शाहू महाराजांचे विचार तळागाळातील नागरिकांमध्ये रुजविण्यासाठी प्रयत्नशील आहे असं संभाजीराजेंनी म्हटलं. ...
निफाड : केंद्र सरकारने पेट्रोल,डिझेल आणि घरगुती गॅसच्या किमतीत भरमसाठ वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहे. या इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी युवा सेनेच्या वतीने रविवारी (दि.३) शांतीनगर त्रिफुलीवर थाळ्या वाजवा आंदोलन करण्यात आले. ...
मनमाड : मनमाड रेल्वे स्थानकातील रेल्वे कॅन्टीनच्या कारणावरून कुरापत काढून शहरातील हॉटेल राधिकासमोर शनिवारी (दि.३) रात्रीच्या सुमारास दोन गटांत हाणामारी झाली. या हाणामारीत तीन जण गंभीर जखमी झाल्याची चर्चा आहे. ...
दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत रविवारी (दि.३) सरासरी ९३ टक्के मतदान झाले असून, पुन्हा कादवा विकास की परिवर्तनला संधी मिळणार, याचा निकाल बंद पेटीत बंदिस्त झाला आहे. रणरणत्या उन्हात वाढलेल्या मतदानाच्या आकडेवारीतून या नि ...
मनमाड : मध्य रेल्वेच्या मनमाड ते इगतपुरी या अतिशय व्यस्त असलेल्या लोहमार्गावर देवळाली ते लहवित स्थानका दरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनल कुर्ला ते मुझफ्फरपूर पवन एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणावर ठप्प झाली. ...
मालेगाव : शहर परिसरावर दिवसेंदिवस सूर्य आग ओकू लागला असून एप्रिल महिन्याच्या प्रारंभीच तापमानाचा पारा ४३ अंशावर पोहोचल्याने नागरिकांना उकाड्याने होरपळून काढले आहे. ...
सटाणा : शहरापासून हाकेच्या अंतरावरील कंधाणा फाट्याजवळील हॉटेलच्या पाठीमागे एका युवकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून झाल्याची खळबळजनक घटना रविवारी (दि.३) सकाळी उघडकीस आली आहे. घमाजी रंगनाथ माळी (वय ४०), रा. पिंगळवाडे असे खून झालेल्या युवकाचे नाव असून ...
मनमाड : येथील मनमाड-खादगाव रोडवरील अस्तगाव शिवारात ट्रॅक्टर व मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकलस्वार राजेंद्र जालिंधर पवार, रा.नवसारी हा तरुण जागीच ठार झाला असून, पाठीमागे बसलेली त्याची पत्नी बायडाबाई राजेंद्र पवार ही गंभीर जखमी झाल् ...