कोरोनाच्या संकट काळात गोरगरिबांच्या मदतीसाठी माणुसकीचे अनेक हात पुढे येत आहेत. या पार्श्वभूमीवर येवला किराणा असोसिएशनने तालुक्यातील १२५ गरीब कुटुंबांना किराणा माल देऊन आधार दिला आहे. ...
संपूर्ण जग कोरोनामुळे हैराण झाले असून, शहरासह ग्रामीण भागातील गावेसुद्धा पछाडल्या गेल्याने प्रशासनासह विविध सामाजिक संघटना पुढे येऊन हातावर पोट असलेल्या कामगारांसाठी अन्नछत्र, किराणा वाटप करत आहे, तर कुणी गाव निर्जंतुकीकरणासाठी सरसावले आहेत. ...
लॉकडाउन काळात दारूविक्री बंद असताना इगतपुरी तालुक्यातील ब्रिटिशकालीन दारणा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या कृष्णानगर कातोरेवाडी येथे सुरू असलेला बेकायदा गावठी दारूचा अड्डा पोलीसपाटील मनोहर जाधव व ग्रामस्थांच्या मदतीने वाडीवºहे पोलिसांनी उद्ध्वस्त केला आह ...
राजापूर परिसरात उन्हाळ कांदा काढण्याची लगबग दिसून येत आहे. उन्हाळ कांद्याला सध्या चारशे ते पाचशे रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे कांदा साठवणुकीला पसंती दिली आहे. ...
लॉकडाउन व संचारबंदीची संधी साधत येथील काही किराणा दुकानदार चढ्या दराने जीवनावश्यक मालाची विक्री करत होते. प्रशासनाने बैठक घेऊन ग्राहकांची लूटमार करू नका व दुकानाच्या दर्शनी भागात भावफलक लावण्याच्या सूचना दुकानदारांना दिल्या होत्या. ...
पेगलवाडी येथे शिधापत्रिकेवर मिळणारा तांदूळ, गहू व मोफत मिळणारा तांदूळ दिला नाही म्हणून शिधापत्रिका घेऊन धान्य घेण्यास आलेला सनी मेढे या संशयिताने स्वस्त धान्य दुकानदार नामदेव झोले व इतरांना मारहाण केली. मेढेविरुद्ध त्र्यंबक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...
सामान्य रुग्णालयात उपचारार्थ आणलेल्या रुग्णांचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या मयताच्या नातेवाइकांसह जमावाने रुग्णालयाची तोडफोड केली. यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली. याप्रकरणी शहर पोलिसांत मयताच्या नातेवाइकांविरोधात गुन्हा ...