शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

पद्मजांच्या सुरावटींनी ‘मंगलदीप पाडवा पहाट’ची मैफल रंगणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 12:37 AM

दीपोत्सव म्हणजे आनंदाची पर्वणी. यानिमित्त भारतीय संगीतातील विविध प्रकारांवर आपल्या गायकीचा ठसा उमटवलेल्या पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांच्या सुरेल स्वरांनी यंदाची ‘मंगलदीप पाडवा पहाट’ उजाडणार आहे.

नाशिक : दीपोत्सव म्हणजे आनंदाची पर्वणी. यानिमित्त भारतीय संगीतातील विविध प्रकारांवर आपल्या गायकीचा ठसा उमटवलेल्या पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांच्या सुरेल स्वरांनी यंदाची ‘मंगलदीप पाडवा पहाट’ उजाडणार आहे. लोकमत सखी मंच आणि सुयोजित व्हिरीडीयन व्हॅलीजच्या वतीने सोमवारी (दि. २८) पहाटे ५.३० वा. या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.दीपोत्सवाच्या या पावन पर्वातील पद्मजाजींच्या या सुरेल मैफलीचे रंग लोकमत वाचक परिवाराचा आनंद द्विगुणित करणार आहेत. गोदापार्कलगतच्या अप्पर सावरकरनगरला ही मैफल रंगणार असून, या कार्यक्रमासाठी हॉटेल एक्स्प्रेस इनचे विशेष सहकार्य लाभले आहे. पद्मजा या प्रख्यात गायिका आणि संगीतकार आहेत. त्यांचा जन्म हा मुळात भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा लाभलेल्या घराण्यात झाला. काही काळातच एक अष्टपैलू गायिका म्हणून त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.त्या भारतीय शास्त्रीय संगीताबरोबरच गझल्स, भक्तिसंगीत हे प्रकारही तितक्याच मधुरतेने गातात. पद्मविभूषित पंडित जसराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण सुरू केले. त्यानंतर त्यांनी पंडित राम नारायण आणि संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडे शिक्षण घेतले आहे. अत्यंत सुरेल असा हा कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी खुला असल्याने रसिकांनी आनंद घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.गाजलेले अल्बम्स आणि गझल्सपद्मजा यांचे ‘ही शुभ्र फुलांची ज्वाला’, ‘रंग बावरा श्रावण’, ‘घर नाचले नाचले’ या नावाचे संग्रह गाजले आहेत. त्यातील कवितांचे लेखन कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर अशा नामवंत कवींनी केलेले होते. त्याशिवाय मराठी गझल्सचा संग्रह असलेले ‘हे गगन’, ‘हे स्पर्श चांदण्याचे’ हे दोन अल्बम व ‘मेघा रे’ची निर्मिती त्यांनी केली होती. माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयींच्या ‘गीत नया गाता हूँ’ या काव्यरचनांवर आधारित अल्बमबद्दल तर खुद्द अटलजींनी त्यांची स्तुती केली होती.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिकLokmat Eventलोकमत इव्हेंट