समाधानकारक पावसाअभावी भात लावणीचा वेग मंदावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 10:39 PM2020-07-12T22:39:34+5:302020-07-13T00:13:46+5:30

इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील नांदूरवैद्य, बेलगाव कुºहे, अस्वली स्टेशन, नांदगाव बुद्रुक, जानोरी, कुºहेगाव, गोंदे दुमाला आदी परिसरात आठवड्यात झालेल्या कमी पावसामुळे मुख्य पीक असलेल्या भात लावणीसह पेरणीची कामे मंदावल्याने शेतकरी चिंतित आहे.

Paddy planting slowed down due to lack of satisfactory rainfall | समाधानकारक पावसाअभावी भात लावणीचा वेग मंदावला

समाधानकारक पावसाअभावी भात लावणीचा वेग मंदावला

Next
ठळक मुद्देउत्पादक चिंतित : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा; कामांना विलंब

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील नांदूरवैद्य, बेलगाव कुºहे, अस्वली स्टेशन, नांदगाव बुद्रुक, जानोरी, कुºहेगाव, गोंदे दुमाला आदी परिसरात आठवड्यात झालेल्या कमी पावसामुळे मुख्य पीक असलेल्या भात लावणीसह पेरणीची कामे मंदावल्याने शेतकरी चिंतित आहे.
इगतपुरी तालुक्यात सध्या पावसाचे प्रमाण दिलासा देणारे असले तरी उशिरा होणाऱ्या भात लागवडीमुळे परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त आहेत. तालुक्याच्या पूर्व भागात पारंपरिक यंत्राच्या साहायाने गाळ करून भात हे प्रमुख पीक घेतले जाते. त्यामुळे गाळ तयार करण्यासाठी भात लावणीला पावसाची आवश्यकता असते. गेल्यावर्षी दारणा धरणाचा जलसाठा सुरक्षित राहण्यासाठी धरणावरील
५२ गेटची दुरुस्ती केल्याने गळतीचे पाणी बाहेर जाणार नाही. धरणाच्या गेटमधून पाणीगळती होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे.

धरण क्षेत्रात पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. आपत्कालीन व्यवस्थेसाठी धरणावर मनुष्यबळ कमी असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली. भात लावणीला सुरुवात करण्यासाठी पावसाची गरज असल्याने या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे मुख्य पीक असलेल्या भात लावणीच्या कामास अडथळा निर्माण होत आहे. भविष्यात दुबार पेरणीच्या संकटांचा सामना करावा लागतो की काय, याची काळजी वाटते.
- देवराम मुसळे, प्रगतिशील शेतकरी

Web Title: Paddy planting slowed down due to lack of satisfactory rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.