शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
6
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
7
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
8
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
9
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
10
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
11
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
12
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
13
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
14
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
15
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
16
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
18
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
19
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
20
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी

सवलतींचे पॅकेज : उत्तर महाराष्टÑाच्या विकासाला बसणार फटकानाशिकच्या उद्योगांना नागपुरात आवतण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 12:21 AM

नाशिक : राज्यातील वातावरण उद्योगस्नेही नसल्याने अनेक उद्योग गुजरातसह अन्य काही राज्यांत स्थलांतरित होत असताना आता नाशिकमधील उद्योग विदर्भात स्थलांतरित करण्याचे वातावरण निर्माण झाले आहे. खुद्द मुख्यमंत्रीच काही उद्योजकांशी चर्चा करून त्यांना नागपूरचे आवतण देत असून, तेथे मिळणाºया संपुटामुळे अनेकांचे उद्योगदेखील सकारात्मक झाले असून, एका उद्योगाने नागपुरात विस्तारीकरणही केले आहे.

ठळक मुद्देसवलतींचे पॅकेज : उत्तर महाराष्टÑाच्या विकासाला बसणार फटकानाशिकच्या उद्योगांना नागपुरात आवतण

संजय पाठक ।नाशिक : राज्यातील वातावरण उद्योगस्नेही नसल्याने अनेक उद्योग गुजरातसह अन्य काही राज्यांत स्थलांतरित होत असताना आता नाशिकमधील उद्योग विदर्भात स्थलांतरित करण्याचे वातावरण निर्माण झाले आहे. खुद्द मुख्यमंत्रीच काही उद्योजकांशी चर्चा करून त्यांना नागपूरचे आवतण देत असून, तेथे मिळणाºया संपुटामुळे अनेकांचे उद्योगदेखील सकारात्मक झाले असून, एका उद्योगाने नागपुरात विस्तारीकरणही केले आहे.नागपूरसह विदर्भाच्या विकासाला विरोध नाही, परंतु अशाप्रकारचा उद्योग पळवण्याचे प्रकार सुरू झाल्याने अनेक जाणकारांना आता वेगळ्या विदर्भाचा वासही येऊ लागला आहे.उत्तर महाराष्टÑाची राजधानी असलेल्या नाशिक जिल्ह्यात हवा, पाणी आणि दळणवळण यामुळे उद्योगांसाठी अत्यंत पोषक वातावरण असल्याचे मानले जाते. सुवर्ण त्रिकोणातील शहरामुळे मुंबई आणि पुण्यानंतर नाशिकचे नाव घेतले जात असले तरी गेल्या काही वर्षांत नाशिकमध्ये नवीन उद्योग आलेला नाही. विशेषत: औद्योगिक क्षेत्र उपलब्ध नसल्याने मोठी अडचण व्यक्त केली जाते. सिन्नरचा सेझ रखडला आहे आणि तेथे निर्यातक्षम उद्योगांनाच सवलत आहे, तर दिंडोरी क्षेत्राची जागा अजूनही फारशी योग्य वाटत नाही त्याचबरोबर तेथील दरही जास्त आहेत. त्यामुळे ‘मेक इन महाराष्टÑ आणि नाशिक’ असे गोंडस नावे देऊनही नवा उद्योग नाशिकला येत नाही. अशावेळी मुंबई आणि पुण्यापाठोपाठ आता नाशिकमध्येही उद्योगांना जागा नाही अशी वेगळीच नकारात्मक बाब पसरली जात आहे. त्याचा फायदा विदर्भ विकासासाठी घेतला जात आहे. परंतु त्याचबरोबर विदर्भात उद्योग उभारण्यासाठी संपुटही दिली जात आहेत. त्याचा फटका नाशिकला बसू लागला आहे.वीजदराचा मोठा प्रश्नराज्य सरकारने मराठवाडा-विदर्भासाठी स्वतंत्र वीजदर घोषित केला. त्यानुसार युनिटमागे १ रुपया १७ पैसे वीजदर अनुदान मिळणार आहे, तर नाशिककरिता४५ पैसे अनुदान आहे. अलीकडेच राज्यशासनाने वाडा येथील डी प्लस झोनलादेखील अशीच सवलत दिली असून, त्यामुळे नाशिकमधील उद्योग विशेषत: रोलिंग मिल-स्टील उद्योग अडचणीच आले आहेत. त्यातूनही विदर्भातील सवलतींचा लाभ मिळवण्यासाठी स्थलांतराचा कल राहू शकतो,असे जाणकारांचे म्हणणे आहे. महाराष्टÑात मुळातच यापूर्वी असलेली जकात आणि त्यानंतर एलबीटी तसेच एमआयडीसीतील अडचणी अशा अनेक कारणांमुळे आधीच अनेक उद्योगांनी गुजरात, चेन्नई, उत्तराखंडकडे उद्योग सुरू केले होते. परंतु नागपूर हे डेस्टिनेशनही उद्योजकांसाठी आकर्षण ठरू लागले आहे.विजेचे दर कमी आणि सरकारकडून हमी अशाप्रकारामुळे नाशिकचे उद्योग सहज जाण्यासाठी तयार होतात. नाशिकमध्ये असलेल्या काही मोठ्या उद्योगांना थेट मुख्यमंत्र्यांनीच साद घातली असल्याची चर्चा आहे. त्यातील एका उद्योगाचे नाशिकमध्ये दोन प्लांट असताना तिसरा प्लांट मात्र नाशिक ऐवजी विदर्भात सुरू केला आहे. काही नवीन प्रकल्प आता विदर्भाचाच विचार करीत असल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्री आणि राज्य सरकार समस्त राज्याचे असताना आता केवळ विदर्भात उद्योग सुरू होण्यासाठी वेगळा सवलतींचा निकष लावणे आश्चर्यकारक ठरले आहे. त्यामुळे नाशिकसह उत्तर महाराष्टÑाच्या विकासाला बाधक ठरण्याची शक्यता आहे.