पाथरे शिवारात बसच्या धडकेत वसईचा साईभक्त ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 14:17 IST2019-04-15T14:17:23+5:302019-04-15T14:17:31+5:30
सिन्नर : सिन्नर- शिर्डी रस्त्यावर पाथरे गावाजवळ हॉटेल वनराईसमोर झालेल्या अपघातात दिंडीतील साईभक्त ठार झाल्याची घटना घडली.

पाथरे शिवारात बसच्या धडकेत वसईचा साईभक्त ठार
सिन्नर : सिन्नर- शिर्डी रस्त्यावर पाथरे गावाजवळ हॉटेल वनराईसमोर झालेल्या अपघातात दिंडीतील साईभक्त ठार झाल्याची घटना घडली. पाथरे शिवारात आरामबसने (एम.एच. ०४ जे. के. २०६९) वसईहून शिर्डी येथे पायी जाणाऱ्या दिंडीतील साईभक्त राजकिशोर सिंग वय (३५) रा. वसई यांना जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर आरामबसने अपघात स्थळावरून पळ काढला होता. वावी पोेलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तपासाची चक्र े फिरवत शिर्डी येथून आरामबस हस्तगत केली. याबाबत चालकाविरोधात वावी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.