ओझरला घरफोडी, ४० हजारांचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:30 IST2019-05-13T00:28:39+5:302019-05-13T00:30:11+5:30
ओझर टाउनशिप : घरातील कुटुंबीय बाहेरगावी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घराच्या लोखंडी दरवाजाचा कडी कोयंडा व आतील कुलूप तोडून घरातील कपाटातून ४० हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेल्याची घटना ओझर येथे घडली.

ओझरला घरफोडी, ४० हजारांचे दागिने लंपास
ओझर टाउनशिप : घरातील कुटुंबीय बाहेरगावी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घराच्या लोखंडी दरवाजाचा कडी कोयंडा व आतील कुलूप तोडून घरातील कपाटातून ४० हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेल्याची घटना ओझर येथे घडली. बागीशकुमार रामचंद्र मिश्रा
(रा. श्रीकृष्णनगर, ओझर) हे कुटुंबीयांसमवेत घर बंद करून बाहेरगावी गेले असल्याची संधी साधत शुक्र वारी (दि. १०) अज्ञात चोरट्याने ४० हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेल्याची तक्र ार रविवारी ओझर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली. त्यानुसार ओझर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक बी.आर. बैरागी करीत आहेत.