ओझर पोलिसांकडून ५७ दुचाकी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 19:37 IST2020-04-24T19:36:49+5:302020-04-24T19:37:11+5:30
कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाउन काळात घरात न थांबता विनाकारण ओझर गावात फिरणाऱ्या ५७ मोटारसायकली पोलिसांनी जप्त करून ११ हजार चारशे रूपयांचा दंड वसूल केला आहे.

ओझर पोलिसांकडून ५७ दुचाकी जप्त
ओझरटाऊनशिप : कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाउन काळात घरात न थांबता विनाकारण ओझर गावात फिरणाऱ्या ५७ मोटारसायकली पोलिसांनी जप्त करून ११ हजार चारशे रूपयांचा दंड वसूल केला आहे.
ओझर पोलिस लाँकडाऊनमध्ये नागरिकांना घरात थांबण्यासाठी ओझर पोलिसांकडून वारंवार आवाहन केले जात असताना विनाकारण फिरणाºया नागरिकांकडून तसेच वाहनचालकांकडून त्याचे उल्लंघन केले जात आहे. यास आळा बसावा यासाठी दुचाकी चालकांविरु द्ध गुन्हे दाखल करणे,मोटारसायकली जप्त करणे तसेच त्यांच्याकडून दंड वसूल करण्याची कारवाई पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यासह कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. सोमवारी (दि.२०)ओझर पोलीसात १८८ कलमान्वये दहा गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्याकडून सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या असून १२०० रु पये दंड वसूल करण्यात आला. दि.२१ रोजी दोन गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्याकडून १३ मोटारसायकली जप्त करु न २६०० रु पयांचा दंड वसूल करण्यात आला. दि. २२ रोजी २ गुन्हे दाखल करण्यात आले. यावेळी २२ मोटारसायकली जप्त करु न त्यांच्याकडून ४४०० रु पये दंड वसूल करण्यात आला. दि. २३ रोजी १२ गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात पाच गुन्हे विनाकारण फिरणारे व सात गुन्हे अन्य ठिकाणाहून ओझर हद्दीत येणाºयांचा समावेश आहे. यावेळी १६ मोटारसायकली जप्त करु न त्यांच्याकडून ३२०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. चार दिवसात विनाकारण फिरणाºया पादचाºयांविरोधात २६ गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच ५७ मोटारसायकली जप्त करून त्यांच्याकडून ११ हजार चारशे रूपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक मथूरे यांनी सांगितले.