ऑक्सिजन गळतीप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:16 AM2021-04-23T04:16:56+5:302021-04-23T04:16:56+5:30

मनपाच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या आवारात असलेल्या ऑक्सिजन टाकीचा पाइप फुटून झालेल्या गळतीमुळे २२ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागल्याची ...

Oxygen leak case of culpable homicide | ऑक्सिजन गळतीप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

ऑक्सिजन गळतीप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Next

मनपाच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या आवारात असलेल्या ऑक्सिजन टाकीचा पाइप फुटून झालेल्या गळतीमुळे २२ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागल्याची दुर्घटना घडली. या घटनेने केवळ राज्यच नव्हे तर अवघा देश हळहळला. संपूर्ण नाशिक शोकसागरात बुडाले. याप्रकरणी नाशिक शहर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी तत्काळ घटनेची गंभीर दखल घेत भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांना याप्रकरणी प्रत्यक्षदर्शी म्हणून फिर्याद देण्यास सांगितले. सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भद्रकाली पोलीस ठाण्यात या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या अज्ञात इसमांविरुद्ध भारतीय दंड विधान कलम-३०४(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांकडून रुग्णालयाच्या आवारात विविधप्रकारे माहितीचे संकलन केले जात आहे. फिर्यादीसाठी मनपाच्या प्रसिद्धीपत्रकाचा आधार घेण्यात आला आहे. २२ रुग्णांचा नावांचाही फिर्यादीमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. या दुर्घटनेत १२ पुरुष व १० महिला यांचा मृत्यू ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या टाकीमधून गळती लागल्याने झाला असून, यात संबंधितांचा निष्काळजीपणा व हलगर्जी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

तूर्तास अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेचा तपास होऊन त्यामध्ये ज्या कोणाचा हलगर्जीपणा समोर येईल, त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून दुर्घटनेस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवून त्यांच्या नावांसह गुन्हा दाखल करण्यात येईल, असे साजन सोनवणे यांनी सांगितले.

Web Title: Oxygen leak case of culpable homicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.