शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
4
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांचे वादग्रस्त विधान
5
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
6
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
7
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
8
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
9
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
10
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
11
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
14
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
15
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
16
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
17
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
18
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
19
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
20
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी

2 हजार रुग्णांनी केली कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 12:09 AM

नाशिक : जिल्ह्यात गुरुवारी (दि.२४) कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या दुप्पट असल्याचे समोर आले; मात्र जिल्ह्यात 24 रुग्ण उपचारादरम्यान मृत्युमुखी पडले. त्यामुळे मृतांचा आकडा आता 1 हजार 249 इतका झाला आहे. दिवसभरात जिल्ह्यात 1 हजार 176 नवे कोरोनाबधित रुग्ण आढळून आले.

ठळक मुद्दे24 बळी : पावणे दोन हजार नवे रुग्ण

नाशिक : जिल्ह्यात गुरुवारी (दि.२४) कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या दुप्पट असल्याचे समोर आले; मात्र जिल्ह्यात 24 रुग्ण उपचारादरम्यान मृत्युमुखी पडले. त्यामुळे मृतांचा आकडा आता 1 हजार 249 इतका झाला आहे. दिवसभरात जिल्ह्यात 1 हजार 176 नवे कोरोनाबधित रुग्ण आढळून आले.कोरोनाबाधितांची संख्या एकीकडे वाढत असताना दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. लक्षणे नसणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने त्यांच्यावर घरीच उपचार सुरु आहेत. त्यांना घरातच विलगिकरण करण्यात आले आहे. गुरुवारी शहरात १ हजार ६५४ रुग्ण, ग्रामीणमधील ५८७, मालेगावमधील ५७ व परजिल्ह्यातील १२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तसेच शहरात नव्याने ७८६, ग्रामीणमध्ये ५८२, मालेगावला ५५ व जिल्ह्यबाहेरील १३ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, गुरुवारी २४ बाधितांचा मृत्यू झाला. त्यात नाशिक शहरात १० तर ग्रामीणमध्ये १२ व मालेगाव आणि परजिल्ह्यात प्रत्येकी १ बाधित रुग्ण दगावला. त्याचप्रमाणे शहरात नव्याने १ हजार ७५६, मालेगावला २९ आणि ग्रामीणमध्ये ८६ संशयितांना दाखल करण्यात आले. तसेच १ हजार ८८४ संशयितांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. तर जिल्हयात गुरुवारी सायंकाळपर्यंत ७ हजार २८२ बाधितांवर उपचार सुरु होते. जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण बाधितांपैकी अवघ्या १० टक्के बाधितांवरच उपचार सुरु आहे.मागील आठवड्यापासून कोरोनाबधित रुग्णांचा आकडा सतत वाढत आहे. कोरोनाबधित रुग्ण मृत्युमुखी पडण्याचे प्रमाणही वाढले आहे. शहरासह जिल्ह्यात संशयित रुग्णांसह कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढू लागली आहे. यामुळे नागरिकांनी शहरात वावरताना अधिकाधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. कोरोना संक्रमणाचा धोका अधिकच वाढला आहे..सार्वजनिक ठिकाणी वावरताना तोंडावर मास्क लावण्यासह सामाजिक अंतर राखत वेळोवेळी हात निर्जंतुक करण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणताना प्रशासनाची दमछाक होत आहे. कोरोना शहरासह जिल्ह्यात नियंत्रणात आणण्यासाठी नाशिककरांना अधिकाधिक खबरदारी घेत शासनाने सांगितलेल्या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे.-- 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य