शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

1600 रुग्णांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 1:10 AM

जिल्हयातील कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढू लागली आहे. शनिवारी (दि.१९) नव्याने १ हजार ३८७ रुग्ण जिल्ह्यात आढळून आले. यापैकी शहरात ८७९ रुग्ण सापडले तर ग्रामिण भागात ४४२ आणि मालेगावात ४७ रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ६२ हजार ५०७ इतकी झाली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात १६ बळी । दिवसभरात कोरोनाचे तेराशे नवीन रुग्ण

नाशिक : जिल्हयातील कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढू लागली आहे. शनिवारी (दि.१९) नव्याने १ हजार ३८७ रुग्ण जिल्ह्यात आढळून आले. यापैकी शहरात ८७९ रुग्ण सापडले तर ग्रामिण भागात ४४२ आणि मालेगावात ४७ रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ६२ हजार ५०७ इतकी झाली आहे. मागील तीन दिवसांच्या तुलनेत शनिवारी शहरात रुग्ण कमी आढळले. जिल्ह्यात दिवसभरात १६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. तसेच दिवसभरात १ हजार ६४२ रुग्णांनी कोरोनावर मात केली.मागील आठवड्यापासून कोरोनाबधित रुग्णांचा आकडा सतत वाढत आहे. तसेच चार दिवसांपासून कोरोनाबधित रुग्ण मृत्युमुखी पडण्याचे प्रमाणही वाढले आहे. शनिवारी मृत्युमुखी पडलेल्यामध्ये शहरातील ६, ग्रामिण-८,मालेगावातील२रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील मृतांचा एकूण आकडा १ हजार १५५वर पोहचला आहे. दिवसभरात जिल्हयात २ हजार ४० संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत.५१ हजार रुग्णांची मातनाशिक जिल्ह्यात आत्तापर्यंत ५१हजार २६१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये नाशिक मनपा हद्दीतील ३६ हजार २३७, ग्रामिण मधील १२ हजार १२६ तर मालेगावातील २ हजार ६४५, जिल्ह्यबाहेरील २५३ रुग्णांचा समावेश आहे. आत्तापर्यंत १ लाख ५६ हजार ४९४ लोक निगेटिव्ह आले आहेत. एकूण ६२ हजार ५०७रुग्ण जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत पॉझिटिव्ह आले होते. यापैकी ४२ हजार ७६६ रुग्ण नाशिक शहरात आहे. ग्रामिण मध्ये १५ हजार ९९२ रुग्ण आहेत.नागरिकांनी अधिकाधिक खबरदारी बाळगणे गरजेचेएकुणच शहरासह जिल्ह्यात संशयित रुग्णांसह कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढू लागली आहे. यामुळे नागरिकांनी शहरात वावरताना अधिकाधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. कोरोना संक्रमणाचा धोका अधिकच वाढला आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना तोंडावर मास्क लावण्यासह सामाजिक अंतर राखत वेळोवेळी हात निर्जंतुक करण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणताना प्रशासनाची दमछाक होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या