कळवणला शेतकरी वर्गाकडून संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 09:39 PM2020-10-15T21:39:34+5:302020-10-16T01:55:35+5:30

कळवण : प्राप्तिकर विभागाच्या कारवाईनंतर कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली असून सरकारच्या शेतकरी विरोधी भूमिकेमुळे संतापाची लाट उसळली आहे. कांदा पाच हजाराच्या पुढे जाताच व्यापाऱ्यांना लक्ष्य केल्याचा आरोप होत आहे. त्याचा परिणाम गुरूवारी (दि.१५) कळवण, अभोणा, कनाशी येथील बाजार समितीत बघायला मिळाला असून कांद्याच्या दरात घसरण झाली आहे.

Outrage from the peasantry to report | कळवणला शेतकरी वर्गाकडून संताप

कळवणला शेतकरी वर्गाकडून संताप

Next
ठळक मुद्देमनमाडला कांद्याची १५०० क्विंटल आवक

कळवण : प्राप्तिकर विभागाच्या कारवाईनंतर कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली असून सरकारच्या शेतकरी विरोधी भूमिकेमुळे संतापाची लाट उसळली आहे. कांदा पाच हजाराच्या पुढे जाताच व्यापाऱ्यांना लक्ष्य केल्याचा आरोप होत आहे. त्याचा परिणाम गुरूवारी (दि.१५) कळवण, अभोणा, कनाशी येथील बाजार समितीत बघायला मिळाला असून कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. गुरु वारी कळवणला सकाळच्या सत्रात गावठी सुपर कांदा दर ५२०० ते ५६७० रु पये होते तर सरासरी ४७०० ते ४८०० रु पये दर होता, गोल्टी ४००० ते ४२०० रु पये तर गोलटा ४४०० ते ४५०० रु पये तर खाद २००० ते ३२४० रु पये दर होता. २४६ ट्रॅक्टर कांद्याची आवक होती. अभोण्याला सकाळच्या सत्रात कांदा खाद २००० ते ३२०० रु पये तर उच्च प्रतीचा कांदा ४८०० ते ५५०० रु पये दर होता, मध्यम प्रतीचा कांदा ४२०० ते ४८०० रु पये तर सर्वसाधारण कांदा ३३०० ते ३८०० रु पये दर होता.


मनमाड: मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरूवारी (दि.१५) १५०० क्विंटल कांद्याची आवक झाली.सकाळच्या सत्रात उन्हाळ कांद्याला प्रति क्विंटल किमान १००० रु पये व कमाल ४३७६ रु पये तर सरासरी ३८०० रु पये दर मिळाला. उन्हाळ कांदा गोल्टीला किमान २७०२ रु पये, कमाल ४००१ तर सरासरी ३६०१ रु पये प्रति क्विंटल असा दर मिळाला. प्राप्तिकर विभागाच्या कारवाईचा कोणताही परिणाम लिलावावर दिसून आला नाही.

Web Title: Outrage from the peasantry to report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.