नवी बेज येथे टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
By Admin | Updated: December 17, 2015 23:24 IST2015-12-17T23:21:55+5:302015-12-17T23:24:04+5:30
नवी बेज येथे टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

नवी बेज येथे टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
कळवण : तालुक्यातील नवी बेज येथील हिंदुस्थानी कला क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळातर्फे टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन दि. २० डिसेंबरपासून करण्यात आल्याची माहिती आयोजक शरद निकम यांनी दिली.
या क्रिकेट स्पर्धांचे प्रथम पारितोषिक कळवण नगरपंचायतचे गटनेते कौतिक पगार यांचेकडून २१००० रुपये, द्वितीय
पारितोषिक कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक
मोहन जाधव व बळीराजा कृषी सेवा केंद्राचे संचालक पंकज जाधव यांचेकडून १५००० रुपये, तृतीय पारितोषिक संजय खैरनार यांचेकडून ७००० हजर रुपये, तर चतुर्थ पारितोषिक सुविधा स्पेशालिटी हॉस्पिटल कळवणतर्फे ४००० रुपये देण्यात येणार आहेत.
तसेच वैयिक्तक बक्षिसे विशाल वाघ हे देणार आहेत. या स्पर्धेत
एलबीडब्ल्यू सोडून सर्व
आंतरराष्ट्रीय सामन्यांचे नियम लागू राहतील. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त क्रिकेट संघांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन
आयोजक शरद निकम यांनी केले आहे. (वार्ताहर)