जिल्ह्यात २० रोजी एलपीजी पंचायतीचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:12 AM2018-04-18T00:12:47+5:302018-04-18T00:12:47+5:30

निफाड : उज्ज्वला दिनानिमित्त येत्या २० एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यात ९० ठिकाणी एलपीजी पंचायतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विशाल काबरा यांनी दिली.

Organizing LPG Panchayat on 20th in the district | जिल्ह्यात २० रोजी एलपीजी पंचायतीचे आयोजन

जिल्ह्यात २० रोजी एलपीजी पंचायतीचे आयोजन

Next

निफाड : उज्ज्वला दिनानिमित्त येत्या २० एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यात ९० ठिकाणी एलपीजी पंचायतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे जिल्हा नोडल अधिकारी विशाल काबरा यांनी निफाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने ग्रामस्वराज्य अभियानाचा एक भाग म्हणून २० एप्रिल हा दिवस देशभरात उज्ज्वला दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत नाशिक जिल्ह्यात नव्वद ठिकाणांवर एलपीजी पंचायत होणार आहे. एलपीजी वापर करणाऱ्या व वापर करू इच्छिणाºया महिलांसाठी ही पंचायत होणार आहे. एका पंचायतीमध्ये पाचशे व त्याहून अधिक महिलांचा सहभाग असणार आहे, असे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी एलपीजीचा सुरक्षित, सोपा वापर तसेच एलपीजी वापराचे फायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची संबंधितांनी पूर्तता करून देणे आवश्यक आहे, असेही काबरा यांनी सांगितले. निफाड येथे शुक्रवारी (दि. २०) दुपारी २ वाजता निफाड येथील शिवनेरी लॉन्स मंगल कार्यालयात एलपीजी पंचायत होणार आहे. नाशिक जिल्ह्यात उज्ज्वला योजनेअंतर्गत आजवर १ लाख १६ हजार ३७ एलपीजी वापरकर्ते लाभार्थी आहेत. त्यात झपाट्याने वाढ होत आहे. एलपीजी पंचायतीत आॅइल व पेट्रोलियम कंपन्यांचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत, अशी माहितीही नोडल अधिकारी विशाल काबरा यांनी याप्रसंगी दिली.

Web Title: Organizing LPG Panchayat on 20th in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.