शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
3
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
4
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
5
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
6
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
7
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
8
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
9
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
10
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
11
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
12
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
13
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
14
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
15
डॉ. दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल; घटनेला १० वर्षे, अडीच वर्षे चालली सुनावणी
16
विलीनीकरण नव्हे, एकत्र काम करणार! शरद पवारांनी दिला चर्चेला पूर्णविराम; 'इंडिया'ला महाराष्ट्रात प्रचंड समर्थन
17
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
18
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
19
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
20
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)

अंगणवाड्यांना नियमानुसार मानधन द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 12:49 AM

महापालिका अंगणवाड्यांतील मुख्य सेविका, सेविका, मदतनीस यांना शासनाच्या नियमानुसार मानधन देण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक दिनकर पाटील यांनी केली असून, यासंबंधीचा प्रस्ताव स्थायी समितीकडे दिला आहे.

ठळक मुद्देप्रलंबित वेतनाअभावी उपासमार : महापालिका स्थायी समितीत प्रस्ताव सादर

नाशिक : महापालिका अंगणवाड्यांतील मुख्य सेविका, सेविका, मदतनीस यांना शासनाच्या नियमानुसार मानधन देण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक दिनकर पाटील यांनी केली असून, यासंबंधीचा प्रस्ताव स्थायी समितीकडे दिला आहे.स्थायी समिती सभापतींना दिलेल्या निवेदनात म्हटले की, महापालिका महिला व बालकल्याण विभागांतर्गत नाशिक महापालिका हद्दीतील विद्यार्थ्यांसाठी १९९४ पासून अंगणवाड्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. सदर अंगणवाड्यांमध्ये कार्यरत सेविकांना दिले जाणारे मानधन अत्यल्प म्हणजे फक्त सुमारे ५ हजार रुपये आहे. या अल्प मानधनावर कुटुंबाची उपजीविका करणे जिकिरीचे असल्याने त्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी. कारण जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत चालविल्या जाणाऱ्या अंगणवाडी सेविकांना सुमारे ८ हजार मानधन देण्यात येते. त्यामुळे मनपा अंगणवाडी सेविकांच्या मनधनात दुप्पट वाढ करण्यात यावी. तसेच त्यांच्याकडून आर्थिक गणना, पल्स पोलिओ डोस, मतदार नोंदणी अभियान, आरोग्य अभियान आदी राष्टÑीय उपक्रम राबविण्यात येतात. या अतिकालीन कामाचे वेतन व अन्य भत्ते अद्याप मिळालेले नाहीत. सदर वेतन तातडीने देण्यात यावे. तसेच थकीत मानधनदेखील मिळावे, त्यांना सेवानिवृत्ती योजना लागू करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. तसेच सदर प्रस्ताव स्थायी समितीवर मंजूर करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाEducationशिक्षण