सेंद्रिय पद्धतीने शेतमाल उत्पादनाची आवश्यकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 00:35 IST2018-09-27T00:33:54+5:302018-09-27T00:35:13+5:30
शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीमध्ये बदल करायला हवा. तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाची मदत घेऊन आपले शेतमाल उत्पादन व उत्पन्न वाढीकडे लक्ष द्यायला हवे.

सेंद्रिय पद्धतीने शेतमाल उत्पादनाची आवश्यकता
नाशिकरोड : शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीमध्ये बदल करायला हवा. तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाची मदत घेऊन आपले शेतमाल उत्पादन व उत्पन्न वाढीकडे लक्ष द्यायला हवे. रासायनिक कीटकनाशके, तणनाशके व खतांचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने शेतमाल उत्पादन घेऊन त्यावर प्रक्रिया उद्योग उभारल्यास शेतकºयांना नक्कीच समाधानकारक उत्पन्न मिळेल, असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ यांनी केले. कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), नाशिक व नाशिक हनीबी फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने शिंदे-पळसे येथील पुंडलिक लॉन्स येथे सेंद्रिय ऊस विकास कार्यशाळेत बोलताना पडवळ म्हणाले की, शेतमालावर प्रक्रिया उद्योग उभारून त्या शेतमालाचे ब्रॅण्डिंग करण्याकडे शेतकºयांनी लक्ष द्यायला हवे. यावेळी महाराष्टÑ बॅँकेचे व्यवस्थापक विक्रांत कुमार, कृषितज्ज्ञ डॉ. जगन्नाथ ढिकले, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. प्रकाश कदम, बायोसर्ट इंडियाचे बाळासाहेब खेमनार आदींनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर कृषी अधिकारी श्रीमती कुलकर्णी, प्रमोद वानखेडकर आदी उपस्थित होते. अध्यक्षपदावरून बोलताना विष्णुपंत गायखे यांनी नाशिक हनीबी कंपनीचा सेंद्रिय गूळ निर्मितीच्या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार आहे. राज्य शासनाच्या मदतीने कृषीप्रक्रिया उद्योगाकडे यशस्वी वाटचाल करत असल्याचे गायखे यांनी सांगितले.