शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

पालखेडमधून पाणी सोडण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 1:13 AM

पालखेड कालवा लाभक्षेत्रातील वितरिका नंबर ४६ ते ५२ वरील संपूर्ण बंधारे जिल्हाधिकाºयांच्या अधिकारातील प्रासंगिक कोठ्यातील पाण्याने भरून देण्याचे आदेश पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांना दिले आहेत.

येवला : तालुक्यातील पालखेड कालवा लाभक्षेत्रातील वितरिका नंबर ४६ ते ५२ वरील संपूर्ण बंधारे जिल्हाधिकाºयांच्या अधिकारातील प्रासंगिक कोठ्यातील पाण्याने भरून देण्याचे आदेश पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांना दिले आहेत.  वितरिका ४६ ते ५२ ला फक्त पावसाळ्यात ओव्हरफ्लोचे पाणी दिले जाते. त्यासाठीही शेतकºयांना सततचा संघर्ष करावा लागतो. यावर्षी बाबा डमाळे यांनी नागपूर, जामनेर, जळगाव, नाशिक व मुंबई अशा फेºया मारत शेतकºयांना बरोबर घेत पालकमंत्र्यांकडे मागणी केली होती.  रब्बी हंगामातील प्रासंगिक पाणी हे जिल्हाधिकाºयांच्या अधिकारात असल्यामुळे या हंगामात पिण्याचे पाणी मागण्याकरिता शेतकरी गेले तर जिल्हाधिकारी कार्यालयातून शेतकºयांना नेहमीच अपमानित केले जाते. मात्र, जिल्हाधिकाºयांच्या समोरच पालकमंत्र्यांकडे भाजपाचे नेते बाबासाहेब डमाळे यांनी अशी तक्र ार करत मागील दोन वर्षे २०० दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक असतानादेखील पिण्याचे पाणी दिलेले आहे. यावर्षी ३५० दशलक्ष घनफूट प्रासंगिक कोठ्यातील पाणी शिल्लक असताना जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन व अप्पर जिल्हाधिकारी रामदास खेडकर पाणी देण्यास नकार देतात.  या पाटपाण्यासंदर्भात बाबा डमाळे यांच्या नेतृत्वाखाली रामूदादा भागवत, बाळासाहेब काळे, नानासाहेब भागवत, आप्पासाहेब भागवत, अरुण देवरे, अमोल सोनवणे, संतोष केंद्रे, नाना शेळके, रावसाहेब मगर, ठकचंद वरे, बाबा शंकर सोनवणे, अण्णासाहेब ढोले, जगदीश गायकवाड, किरण सोनवणे, भास्करराव भागवत, ज्ञानेश्वर वडाळकर, शिवाजी भागवत, रामनाथ पवार, नामदेव भागवत, भरत बोंबले, गणपत भागवत, सीताराम सोनवणे, रमेश सोनवणे, शिवनाथ सोनवणे, रघुनाथ एंडाईत यांच्यासह  शेकडो शेतकरी नाशिक येथे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या समवेत झालेल्या बैठकीस उपस्थित होते.अभिनंदनाचे फलकही बाब पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली असता पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाºयांना बजावले की, आपणास पाणी सोडता येत नसेल तर मी माझे अधिकारातील पाणी सोडण्याचे आदेश देत आहे, असे स्पष्ट करून महाजन म्हणाले की, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक राजेश मोरे, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, कार्यकारी अभियंता राघवेंद्र भाट, पालकमंत्र्यांचे शासकीय सचिव संदीप जाधव, वैभव भागवत तुम्ही एकत्रित बसून नियोजन करा व दोन दिवसात याबाबतचे आदेश करा, असा आदेश दिल्यानंतर १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी उशिरा जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी वितरिकावरील सर्व बंधारे पाण्याने भरून देण्याचे पाटबंधारे अधिकाºयांना निर्देश दिले. याबद्दल अंदरसूलपासून पूर्व भागातील शेतकºयांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण असून, पालकमंत्री गिरीश महाजन यांचे अभिनंदनाचे ठिकठिकाणी फलक लावण्यात आले आहेत.

टॅग्स :DamधरणWaterपाणी