पाणीचोरी प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश
By Admin | Updated: August 23, 2015 00:22 IST2015-08-23T00:18:14+5:302015-08-23T00:22:55+5:30
येवला : शासकीय अधिकार्यांची पाहणी

पाणीचोरी प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश
येवला : तालुक्यातील ३८ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची मुख्य जलवाहिनी धुळगाव परिसरातील शेतकरी प्रवीण बाळासाहेब सोनवणे यांनी एअर व्हॉल्व्ह खोलून हजारो लिटर पाणीचोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे.
पाणीपुरवठा कर्मचारी विठ्ठल घुले यांच्या निदर्शनास सदर घटना येताच त्यांनी वरिष्ठांना कळविताच तासाभरात तहसीलदार शरद मंडलिक, गटविकास अधिकारी सुनील आहिरे, प्रभारी सभापती जयश्री बावचे, ३८ गाव पाणीपुरवठा अध्यक्ष सचिन कळमकर, उपाध्यक्ष मोहन शेलार, सचिव डी.जी. सपकाळे, श्याम बावचे, उत्तम घुले, ए.एस. बागुल यांच्यासह पंचायत समिती अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांना पहाताच सोनवणे कुटुंबीयांची धावपळ सुरू झाली.
पाणीचोरीबाबतचे सत्य काय आहे ही माहिती तहसीलदारांसह पदाधिकार्यांनी घेतली. या बाबत खात्नी पटल्याने संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. ३८ गाव योजनेच्या जल शुद्धीकरण केंद्र बाभूळगाव येथील साठवण तलावातून गेल्या दोन दिवसापूर्वी मध्यरात्नीच्या सुमारास शेतकरी तलावात मोटार टाकून पाणी घेण्याच्या उद्देशाने आले. परंतु कर्मचारी उत्तम घुले यांनी जागरूकतेने कर्तव्य केले. ही बाब त्यांनी वरिष्ठांना फोनवरून
सांगितली.
त्यामुळे पाणीचोरीचा प्रयत्न अपयशी ठरला.
पाणीचोरीचा असा प्रकार पुन्हा आढळला तर गुन्हा दाखल करावा असा आदेश कर्मचारी वर्गाला देण्यात आला. पाणीचोरी होऊ नये म्हणून पोलिसांना रात्नीची गस्त या परिसरात घालण्यास सांगण्यात आले आहे. (वार्ताहर)