कृषी सन्मान योजनेचे काम त्वरित करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 18:29 IST2019-06-25T18:28:12+5:302019-06-25T18:29:11+5:30
दोन हेक्टरहून अधिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनाही आता पंतप्रधान कृषी सन्मान योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे तालुक्यातील अशा शेतकऱ्यांचे क्षेत्र, त्यांचे आधार आणि बँक खाते क्रमांकाची माहिती तातडीने संकलित करा. ३० जूनअखेर हा संपूर्ण डाटा आॅनलाइन अपडेट करण्याचे काम पूर्ण करा, अशा सूचना तहसीलदार राहुल कोताडे यांनी दिल्या.

कृषी सन्मान योजनेचे काम त्वरित करण्याचे आदेश
सिन्नर : दोन हेक्टरहून अधिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनाही आता पंतप्रधान कृषी सन्मान योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे तालुक्यातील अशा शेतकऱ्यांचे क्षेत्र, त्यांचे आधार आणि बँक खाते क्रमांकाची माहिती तातडीने संकलित करा. ३० जूनअखेर हा संपूर्ण डाटा आॅनलाइन अपडेट करण्याचे काम पूर्ण करा, अशा सूचना तहसीलदार राहुल कोताडे यांनी दिल्या.
प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेची व्याप्ती वाढविल्यानंतर त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी सिन्नर तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत कोताडे बोलत होते. नायब तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्यासह तलाठी, मंडल अधिकारी, कृषी सहायक आणि ग्रामसेवक या बैठकीस उपस्थित होते.
ठरवून दिलेल्या अधिकारी, कर्मचाºयांनी आपापल्या गावातील शेतकºयांची माहिती संकलित करून ती आॅनलाइन भरण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी.
माहिती भरून झाल्यानंतर नव्याने या योजनेत समावेश झालेल्या शेतकºयांना दोन हजारांचा पहिला हप्ता शासनाकडून बँक खात्यावर वर्ग केला जाणार आहे. यापूर्वी दोन हेक्टरच्या आतील
जे शेतकरी योजनेपासून वंचित आहेत, त्यांचीही माहिती अपलोड करण्याच्या सूचना तहसीलदार कोताडे यांनी कर्मचाºयांना
दिल्या. तालुक्यात दोन हेक्टरच्या आतील ८८ हजार शेतकरी
होते. त्यातील ५९ हजार शेतकरी पंतप्रधान सन्मान योजनेसाठी पात्र ठरले होते.
पैकी ४०,१२८ शेतकºयांचा
डाटा अपलोड केला आहे.
उर्वरित शेतकºयांनी माहिती आॅनलाइन भरण्याचे काम सुरू
आहे. त्यातच आता क्षेत्राची
मर्यादा शिथिल केल्याने लाभार्थीसंख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
तहसीलमध्ये स्वतंत्र कक्ष
प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेचे काम जलदगतीने होण्यासाठी तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तहसील, पंचायत समिती आणि कृषी विभागाच्या प्रत्येकी एका कर्मचाºयाची या कक्षात नियुक्ती करण्यात आली आहे. हे कर्मचारी आपापल्या विभागांच्या कर्मचाºयांकडून दररोज माहिती संकलित करून ती आॅनलाइन अपडेट करतील. त्यामुळे कामात सुलभता येईल.