नाशिक शहर व परिसरासाठी आज ऑरेंज अलर्ट, होळकर पुलाखालून पुढे रामकुंडात 11210 क्युसेक इतक्या वेगाने पाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 11:34 IST2025-09-28T11:32:27+5:302025-09-28T11:34:18+5:30
पुराचे पाणी रामकुंडा बाहेर थेट कपालेश्वर पोलीस चौकी पर्यंत आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

नाशिक शहर व परिसरासाठी आज ऑरेंज अलर्ट, होळकर पुलाखालून पुढे रामकुंडात 11210 क्युसेक इतक्या वेगाने पाणी
नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे. पुराचे पाणी रामकुंडा बाहेर थेट कपालेश्वर पोलीस चौकी पर्यंत आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. होळकर पुलाखालून पुढे रामकुंडात 11210 क्युसेक इतक्या वेगाने पाणी प्रवाहित झाले असून गोदावरी नदीने इशारा पातळी गाठली आहे.
गोदाकाठावरील सर्वच लहान मोठ्या मंदिरांना आता जवळपास पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. लहान मंदिरे पाण्याखाली बुडाली आहे टाळकोटेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात सुद्धा पाणी शिरल्या असून नारोशंकर मंदिर तसेच निळकंठेश्वर मंदिराच्या पायऱ्यांना पाणी लागले आहे. तपोवन परिसरात सुद्धा पाणी पातळी वाढली आहे त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांना नदीपात्राजवळ जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे तसेच विक्रेत्यांना देखील स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आले आहे.यामुळे नदी काठालगत अति सतर्कतेचा इशारा जाहीर करण्यात आला आहे.