शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
2
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
3
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
4
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
5
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
6
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
7
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
8
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
10
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
11
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
12
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
13
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
14
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
15
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
16
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
17
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
18
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
19
आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश
20
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."

मखमलाबाद ‘टीपी स्कीम’च्या सादरीकरणालाच विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 00:46 IST

स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलाबाद येथे टीपी स्कीमच्या (नगररचना योजना) प्रारूपाचे सादरीकरण शनिवारी (दि.४) सादरीकरण करण्यात येत आहे. बहुतांशी शेतकरी राजी झाल्याचा दावा करीत हे सादरीकरण करण्यात येणार असले तरी विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी मात्र, आधी महासभेच्या ठरावानुसार मागण्या मान्य झाल्याचे लेखीपत्र सादर करावे आणि मगच सादरीकरण करावे, अशी भूमिका घेतली आहे.

ठळक मुद्देशेतकरी विचारणार जाब : स्मार्ट सिटीने बोलवली बैठक

नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलाबाद येथे टीपी स्कीमच्या (नगररचना योजना) प्रारूपाचे सादरीकरण शनिवारी (दि.४) सादरीकरण करण्यात येत आहे. बहुतांशी शेतकरी राजी झाल्याचा दावा करीत हे सादरीकरण करण्यात येणार असले तरी विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी मात्र, आधी महासभेच्या ठरावानुसार मागण्या मान्य झाल्याचे लेखीपत्र सादर करावे आणि मगच सादरीकरण करावे, अशी भूमिका घेतली आहे.स्मार्ट सिटी अंतर्गत मौजे नाशिक आणि मखमलाबाद येथे सव्वासातशे एकर क्षेत्रात हरित क्षेत्र विकास करण्यात येणार असून, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा देऊन नियोजनबद्धनगर उभारण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी तेथे नगररचना योजना म्हणजे टीपी स्कीम राबविण्यात येणार आहे आणि घेतलेल्या जमिनी पैकी ५० टक्केजागा फायनल प्लॉट म्हणून शेतकºयांना देण्यात येणार आहे. या प्रकल्पाबाबत शेतकºयांमध्ये मतभेद आहेत. काही शेतकºयांनी अटी-शर्तींवर संमती दिली होती, तर शेतकºयांच्या दुसºया गटाने उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या आधी घाईघाईने यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर करण्यासाठी महापालिकेची महासभा घेण्यात आली. यावेळी शेतकºयांच्या मागणीची अंमलबजावणी करावी अशा आशयाचा ठराव करण्यात आला, परंतु यातील नगररचना योजना मंजुरीसाठी इरादा घोषित करण्यासाठी संमती आवश्यक असल्याने त्या अनुषंगाने तेवढाच ठराव शासनाकडे पाठविण्यात आला.अन्य मागण्या शासनाच्या अखत्यारित असल्याने त्यावर शासनच निर्णय घेईल असे सांगण्यात आले खरे मात्र, प्रत्यक्षात नगररचना योजना करण्याच्या इराद्यानुसार शासनाने राजपत्र प्रसिद्ध केले.अनेक मागण्या : शेतकºयांना प्रतीक्षाशेतकºयांनी केलेल्या मागण्या शासनाने मंजूर केल्या असतील तर तसा अध्यादेश प्रसिद्ध झाल्यानंतरच या मसुद्याचे सादरीकरण करावे, अशी एका गटाची मागणी आहे. वाढीव एफएसआय, शहरातील उर्वरित भागाप्रमाणेच घरपट्टी असावी, गुजरातच्या धरतीवर ५० टक्के टायटल क्लिअर भूखंड द्यावा, बेटरमेंट चार्जेस रद्द करावे, नजराणा रक्कम माफ करावी, स्मार्ट सिटीचा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण न झाल्यास योजना रद्द करून शेतकºयांना तत्काळ जमिनी द्याव्यात अशा अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यावर शासनाने निर्णय घेऊन जोपर्यंत त्यासंदर्भातील निर्णयांचा अध्यादेश प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत टीपी स्कीमला स्थगिती द्यावी, अशी विरोध करणाºया शेतकºयांची मागणी असून शनिवारी (दि.३) ते सादरीकरणाच्या वेळी विरोध करणार आहेत.४नगररचना योजना राबविण्यासाठी नऊ महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. परंतु स्मार्ट सिटीने हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी नगररचनाचे प्रारूप तयार करण्यात आले आहे.४ प्रारूप सादरीकरण शनिवारी (दि.३) सकाळी १० वाजता कालिदास कलामंदिरात करण्यात येणार आहे. मात्र, बाधितांना उपस्थित राहण्यासाठी पत्रच मिळाले नसल्याचे दावेदेखील करण्यात येत आहे.बांधकामांना कोणत्या नियमाने नाकारली परवानगीजोपर्यंत शासनाकडून नगरररचना योजना आणि शेतकºयांच्या मागण्यांबाबत अंतिम निर्णय होत नाही. तोपर्यंत प्रस्तावित क्षेत्रातील नूतन बांधकामांना परवानगी नाकारू नये, असे महासभेने केलेल्या ठरावात नमूद केले होते. एमआरटीपी १९९६ अ‍ॅक्टमधील कलम ६९ अन्वये टीपी स्कीम घोषित होत नाही तोपर्यंत बांधकामांना परवानग्या द्याव्यात तसेच प्रचलित तरतुदीने दिलेल्या अशा बांधकाम क्षेत्राला परियोजनेतून वगळावे, असे ठरावात अकराव्या क्रमांकावर नमूद करण्यात आल्यानंतरही आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बांधकाम परवानग्या नाकारण्यासंदर्भात पत्रक काढले. त्यामुळे अनेक बांधकामाचे प्रस्ताव पडून आहेत. त्यामुळे याबाबतदेखील नाराज शेतजमीन मालकांनी महासभेच्या ठरावाच्या विरोधात आयुक्तांनी भूमिका घेतल्याने न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजना