झोपडपट्टी हटविण्यास पिपल्स रिपाइंचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 01:25 IST2018-12-18T01:25:29+5:302018-12-18T01:25:51+5:30

सामनगावरोडवरील हनुमाननगर येथील शासकीय जागेवरील झोपडपट्टी हटवू नये या मागणीसाठी पिपल्स रिपाइंच्या वतीने मनपा विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

 Opposition to the People's Republicans to remove the slum | झोपडपट्टी हटविण्यास पिपल्स रिपाइंचा विरोध

झोपडपट्टी हटविण्यास पिपल्स रिपाइंचा विरोध

नाशिकरोड : सामनगावरोडवरील हनुमाननगर येथील शासकीय जागेवरील झोपडपट्टी हटवू नये या मागणीसाठी पिपल्स रिपाइंच्या वतीने मनपा विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.  सामनगावरोडवरील हनुमाननगर येथील शासकीय जागेवरील झोपडपट्टी हटवू नये या मागणीसाठी पिपल्स रिपाइंचे जिल्हाप्रमुख शशिकांत उन्हवणे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी नाशिकरोड मनपा विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. विभागीय प्रशासकीय वरिष्ठ लिपिक ढामसे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सामनगावरोडवरील पाट बंधारेच्या बंद पडलेला पाटावर हनुमाननगर झोपडपट्टी अनेक वर्षांपासून वसलेली आहे. शासनाच्या नियमानुसार झोपडपट्टी कायम करून तेथील रहिवासींच्या नावावर जागा करण्यात यावी, पूर्वसूचना दिल्याशिवाय अतिक्रमण काढण्याची कारवाई करू नये, प्रथम रहिवाशांचे पूनर्वसन करून पक्की घरे द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर कैलास पगारे, नितीन पगारे, अनिल साठे, संतोष सोनवणे, शकील शेख, मोहन पांचाल, हिराबाई बंदरे आदिंच्या सह्या आहेत.

Web Title:  Opposition to the People's Republicans to remove the slum