शेतकरी आंदोलनास ‘वंचित’चे समर्थन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 00:58 IST2020-12-18T19:46:19+5:302020-12-19T00:58:30+5:30
सिन्नर : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे समर्थन करण्यात आले असून, शेतमालाला हमीभाव द्यावा, रेल्वेचे खासगीकरण रद्द करण्यात यावे यासह विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे.

शेतकरी आंदोलनास ‘वंचित’चे समर्थन
महाराष्ट्रातील आघाडी सरकारमधील सर्व पक्षांनी शेतकरी आंदोलनास पाठिंबा दिला आहे. महाआघाडीची भूमिका प्रामाणिक असेल तर महाराष्ट्रातील शेतकरी विरोधी बाजार समितीच्या कायद्यात दुरुस्ती करणारा अध्यादेश ताबडतोब काढावा, भारतीय रेल्वेच्या खासगीकरणामुळे शेतमालाची वाहतूक प्रचंड खर्चिक होईल. सर्वसामान्य ग्राहकांवर जादा भावाचे ओझे लादेल. त्यामुळे रेल्वे खासगीकरणाचा निर्णय केंद्र सरकारने ताबडतोब रद्द करावा, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. यावेळी तालुकाप्रमुख प्रवीण जाधव, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश निकम, शहरप्रमुख तुषार जाधव, मार्गदर्शक मधुकर जाधव, संघटक दीपक हिरे, नाना जाधव, गणेश दिवे, विजय फुलपगारे, पंकज साळवे, बापू साळवे, पवन जगताप, बॉबी दिवे आदी उपस्थित होते.