शाळेत कंत्राटी पद्धतीने शिपाई भरतीला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 00:26 IST2020-12-17T20:45:35+5:302020-12-18T00:26:03+5:30

कसबे सुकेणे :- महाराष्ट्र शासनाने अध्यादेश काढून राज्यातील शाळांमधील चतुर्थ श्रेणी कर्मचारी असलेले शिपायाचे पद संपुष्टात आणले असून, त्या जागी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली जाणार आहे, त्यामुळे राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून, ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत, असा इशारा राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी दिला आहे.

Opposes peon recruitment on contract basis in school | शाळेत कंत्राटी पद्धतीने शिपाई भरतीला विरोध

शाळेत कंत्राटी पद्धतीने शिपाई भरतीला विरोध

ठळक मुद्देराज्य चतुर्थश्रेणी कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

याबाबतचे निवेदन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना दिले आहे. कारवाई न झाल्यास आंदोलनाशिवाय पर्याय नाही, सर्व विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी यात सहभागी होऊन शासकीय कामकाज बंद करू, असा इशाराही पठाण यांनी दिला आहे. शासनाने सध्या शाळांचेही खासगीकरण करण्याचे ठरवले असून, त्या दिशेने वाटचाल करत अशाप्रकारे पावलं टाकायला सुरुवात केली आहे, हे कदापिही सहन केले जाणार नाही, त्यामुळे तत्काळ हा अद्यादेश रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, महाराष्ट्राच्या सर्व विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी यात सहभागी होऊन शासकीय कामकाज बंद पाडतील, असा इशाराही पठाण यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
एक लाख कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा
शालेय शिक्षण स्तरावरील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृतीबंधाचा आदेश निर्गमित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले; पण अशाप्रकारे आदेश निघतील, याची सूतराम कल्पनादेखील नव्हती. शिपाई, रात्रीचा पहारेकरी, नाईक, सफाईगार, कामाठी, हमाल, परिचर, प्रयोगशाळा इत्यादी विभागातील कर्मचारी नियत वयोमानानुसार निवृत्त झाल्यानंतर त्याजागी आता हे कंत्राटी शिपाई पदे व्यापणार आहेत. परिणामी, शासकीय अनुदानित शाळांमधील राज्य शासनाचा चतुर्थश्रेणी कर्मचारी ही संकल्पनाच संपुष्टात येणार आहे. सुमारे एक लाख कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येणार आहे.

Web Title: Opposes peon recruitment on contract basis in school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.