कार्यकारिणीला विरोध करणे म्हणजे सोनिया गांधींना विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:18 IST2021-09-06T04:18:33+5:302021-09-06T04:18:33+5:30
------ चौकट= आम्हाला मिळाले नाही म्हणून दुसऱ्यांना मिळाल्यास विरोध करणे मुळात चुकीचे आहे. कार्यकारिणीला विरोध करणे म्हणजे त्याला मंजुरी ...

कार्यकारिणीला विरोध करणे म्हणजे सोनिया गांधींना विरोध
------
चौकट=
आम्हाला मिळाले नाही म्हणून दुसऱ्यांना मिळाल्यास विरोध करणे मुळात चुकीचे आहे. कार्यकारिणीला विरोध करणे म्हणजे त्याला मंजुरी देणाऱ्या सोनिया गांधी यांना विरोध करण्यासारखे असून, ज्यांची प्रदेशवर काम करण्याची तयारी होती, त्यांनी कधी पक्षाला तसे सांगितले का? आदिवासी भागात काम करणाऱ्यांना संधी मिळाली तर बिघडले कोठे?
-जयप्रकाश छाजेड, प्रदेश उपाध्यक्ष
-----
प्रदेश कार्यकारिणीत आता बदल होणे शक्य नाही. या यादीला विरोध करणे म्हणजे पक्षात शिस्त नसल्याचे लक्षण आहे. पहिल्यांदा आदिवासी कार्यकर्त्यांना प्रदेशवर काम करण्याची संधी मिळाली आहे. पक्षश्रेष्ठींनी आम्हाला कामाला लागा, असा सल्ला दिला असून, लवकरच सर्वच पदाधिकारी सक्रिय झालेले दिसतील.
- राजाराम पानगव्हाणे, प्रदेश उपाध्यक्ष
---------
प्रत्येक कार्यकर्त्याला पदाची अपेक्षा असते, परंतु साऱ्यांचीच वर्णी लागेल, असे होत नाही. प्रदेशाध्यक्ष, मंत्री, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी सर्वांशी संबंध असतात. त्यातून नावे दिली जातात. प्रदेशाध्यक्षांची त्याला मान्यता असते. प्रभारींकडून ती निश्चित होऊन पक्षाध्यक्षांकडे पाठविली जातात. त्यामुळे ज्यांना त्यात त्रुटी, उणिवा वाटत असतील, त्या दूर केल्या जातील.
- शाेभाताई छाजेड, प्रदेश सरचिटणीस
-----
माझे वडील पक्षाचे आमदार होते. गेल्या ३० वर्षांपासून मी पक्षात सक्रिय आहे. पक्षासाठी सतत काम केल्यामुळेच महिला काँग्रेसच्या प्रदेशवर काम करण्याची संधी मिळाली हाेती. त्यामुळे काम केले की संधी मिळते. काम केले नाही की, पक्ष त्यांचा विचार करीत नाही, हे विरोध करणाऱ्यांनी ध्यानात ठेवावे.
- सुमित्रा बहिरम, प्रदेश चिटणीस