शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

अकरावी प्रवेशासाठी रविवारपासून ऑनलाईन अर्जाचा भाग एक भरण्यासाठी संधी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 5:50 PM

अकरावी प्रवेशप्रक्रिया राबविण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून, या प्रक्रियेच्या माध्यमातून नोंदणी करणाऱ्या शहरातील ६० महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी एकूण २५ हजार ३० जागा उपलब्ध आहेत. या जागांवर प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना रविवार (दि.२६) पासून ऑनलाइन अर्जाचा भाग एक भरण्याची संधी मिळणार आहे.

ठळक मुद्देअकरावी प्रवेश प्रक्रियेला रविवार पासून सुरुवातऑनलाईन अर्जाचा भाग एक भरता येणार भाग दोनची प्रक्रिया दहावीच्या निकालानंतर

नाशिक : महापालिका क्षेत्रातील अकरावी प्रवेशप्रक्रिया राबविण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून, या प्रक्रियेच्या माध्यमातून नोंदणी करणाऱ्या शहरातील ६० महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी एकूण २५ हजार ३० जागा उपलब्ध आहेत. या जागांवर प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना रविवार (दि.२६) पासून ऑनलाइन अर्जाचा भाग एक भरण्याची संधी मिळणार असून, या अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया दहावीच्या निकालानंतर पूर्ण करावी लागणार आहे. अकरावी प्रवेशासाठी शहरात गेल्या वर्षाच्या तुलनेत एक महाविद्यालयाची भर पडली आहे. या महाविद्यालयातील वाढलेल्या जागांसह नाशिक शहरात एकूण २५ हजार ३० जागा अकरावी प्रवेशासासाठी उपलब्ध झाल्या असून, यात सर्वाधिक विज्ञान शाखेच्या १० हजार १६०, वाणिज्यच्या ८ हजार ६००, कला शाखेच्या ४ हजार ९१०  व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या (एचएसव्हीसी) १३६० जागांचा समावेश आहे. यापूर्वी अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवारपासून (दि. १५) सुरू होणार होती. मात्र, पुणे, पिंपरी-चिंचवडसह अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन झाल्याने सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सुधारित वेळापत्रकानुसार प्रवेश अर्जाचा भाग भाग एक भरण्याची प्रक्रिया २६ जुलैपासून सुरू होईल, तर दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-२ अर्थात महाविद्यालयाचे पर्याय (पसंतीक्रम) निवडीसाठी अर्जाचा भाग दोन भरता येणार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी वाढीव प्रवेशशुल्काचा भुर्दंड टाळण्यासाठी अनुदानित महाविद्यलयांमधील जागांचा पर्याय निवडण्याचे आवाहन  शिक्षण विभागाने केले आहे.  

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय