कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये बाह्य रुग्ण विभाग कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:39 IST2021-02-05T05:39:52+5:302021-02-05T05:39:52+5:30
मागील नऊ महिन्यात देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलने सर्व कोरोना आजाराच्या रुग्णांवर उपचार केले. त्यामुळे हॉस्पिटलला सार्वजनिक आरोग्य कोविडसाठी आव्हान या ...

कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये बाह्य रुग्ण विभाग कार्यान्वित
मागील नऊ महिन्यात देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलने सर्व कोरोना आजाराच्या रुग्णांवर उपचार केले. त्यामुळे हॉस्पिटलला सार्वजनिक आरोग्य कोविडसाठी आव्हान या श्रेणीत रक्षामंत्री अवॉर्ड देखील प्राप्त झाले आहे. आता देवळालीसह पंचक्रोशीत कोरोनाही आटोक्यात आल्याने देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमधील सर्व सेवा टप्प्याटप्याने सुरु करण्यात येणार आहे. सोमवारपासून बाह्य रुग्ण विभाग सुरु करण्यात आला असून नागरिकांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन सर्व लोकप्रतिनिधींनी केले आहे. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेत हे हॉस्पिटल पुन्हा सुरु करावे अशी मागणी येथील रिपाइं व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांची भेट घेत निवेदनाद्वारे केली होती. या सर्व बाबी ध्यानात घेत बोर्डाचे सीईओ व घटना व्यवस्थापक अजय कुमार यांनी हा निर्णय घेतला आहे.