अडचणी सहन करण्याची क्षमता फक्त शेतकऱ्यांमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 00:13 IST2020-02-19T22:42:30+5:302020-02-20T00:13:21+5:30
सर्व अडचणी सहन करण्याची क्षमता फक्त शेतकऱ्यांमध्ये असून, कलियुगात सत्याला त्रास असल्याचे प्रतिपादन निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केले.

चितेगाव येथे निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांची बैलगाडीतून काढण्यात आलेली मिरवणूक.
ठळक मुद्देइंदोरीकर : बैलगाडीतून काढली मिरवणूक
चांदोरी : सर्व अडचणी सहन करण्याची क्षमता फक्त शेतकऱ्यांमध्ये असून, कलियुगात सत्याला त्रास असल्याचे प्रतिपादन निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केले.
चितेगावमध्ये सार्वजनिकरीत्या शिवजयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने आयोजित कीर्तन सोहळ्यात ते बोलत होते. शिवप्रतिष्ठानच्या वतीने सदर कीर्तन आयोजित करण्यात आले होते. सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास महाराजांचे आगमन
होताच ग्रामस्थांनी त्यांची बैलगाडीमध्ये बसून मिरवणूक काढण्यात आली. प्रारंभी त्यांनी शिवरायांना अभिवादन करून कीर्तनाला सुरु वात केली. कीर्तन सोहळ्यास परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.