शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

त्र्यंबकेश्वर तालुक्यात अवघ्या ४५पेरण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 15:57 IST

त्र्यंबकेश्वर : यावर्षी बळीराजाची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली असुन केवळ ४० ते ४५ टक्के पेरण्या झाल्या असुन अद्याप पेरण्या अपुर्ण आहेत. ज्यांनी पेरण्या पुर्ण केल्या आहेत. अशांच्या तोंडचे पाणी पावसाअभावी पळाले आहे. जुन, जुलै अखेर अवघा ४५९ मि मी एवढाच पाउस पडला आहे. ही बाब शेतकऱ्यांच्या दृष्टीने चिंताजनक म्हणावी लागेल.

ठळक मुद्देदोन महिने संपले पण अद्याप पाउस ४५९ मि.मि. वरच !

लोकमत न्युज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : यावर्षी बळीराजाची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली असुन केवळ ४० ते ४५ टक्के पेरण्या झाल्या असुन अद्याप पेरण्या अपुर्ण आहेत. ज्यांनी पेरण्या पुर्ण केल्या आहेत. अशांच्या तोंडचे पाणी पावसाअभावी पळाले आहे. जुन, जुलै अखेर अवघा ४५९ मि मी एवढाच पाउस पडला आहे. ही बाब शेतकऱ्यांच्या दृष्टीने चिंताजनक म्हणावी लागेल.त्र्यंबकेश्वर तालुका पावसाचे माहेरघर समजला जातो. पण या वर्षी त्र्यंबकवर पाउस कोपला आहे. एरवी त्र्यंबक शहरासह तालुक्यात दोन महिन्यात १२०० ते १५०० मि. मी. पाउस पडतो आणि लोकांच्या पेरण्या पुर्ण होतात.श्रावणात शेतीची कामे पुर्ण होउन भाद्रपदात निंदणीची कामे पुर्ण होतात. दरम्यान त्र्यंबकेश्वर जवळ महिरावणी येथे नाशिक जिल्ह्याच्या पुर्वभागात सारखा पाऊस पत असून लागवड झालेली पिके पाण्याखाली गेलेली दिसत आहेत. पण त्र्यंबक परिसरात पावसाचा थेंब नाही. काळे ढग आकाशात गर्दी करतात. जोराचा पाऊस येईल. पण अचानक वारा सुटतो आणि जमलेले ढग वाºयाच्या झोतात विखुरले जातात. असा सद्या खेळ सध्या सुरु आहे.३१ जुलैपर्यंत मागील पाच वर्षाची आकडेवारी पाहता सन २०१५-३०१ मि.मि., २०१६-८८६ मि.मि., २०१७-१५१० मि.मि., २०१८-१०७८ मि.मि., २०१९-१२७४ मि.मि., तर यावर्षी अवघा ४५९ मि.मि. पाउस पडला आहे. त्यामुळे यावर्षी त्र्यंबकेश्वरला पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. तालुक्यात खरीपाचे २४४०० हेक्टर क्षेत्र असुनही भात, नागली, वरई, खुरसणी, उडीद आदींची पेरणी पुर्ण होउ शकलेली नाही.या भागातील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबुन असते. अर्थात ज्यांच्या शेतात विहीरीचे पाणी उपलब्ध आहे. असे लोक भाताला पाणी भरु शकतात. पण ज्यांच्याकडे विहीरच नाही असे लोक काहीच करु शकत नाहीत. आपल्या डोळ्यासमोर भाताचे पिक नष्ट होतांना उघड्या डोळ्यांनी पाहावे लागत आहे. आज अनेक शेतकऱ्यांची पिके पिवळे पडत चालले आहेत. आता दुबार पेरणीसाठी देखील बळीराजाची आर्थिक कुवत राहीली नसल्याने शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस