नाफेडकडून होणार केवळ एकरी बारा क्विंटल मक्याची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 00:01 IST2020-05-26T20:54:45+5:302020-05-27T00:01:58+5:30
सायखेडा : व्यापारी वर्गाकडून भरड्या मालातील मक्याला कवडीमोल किंमत मिळत असल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने नाफेडच्या माध्यमातून एकरी बारा क्विंटल मका खरेदीला परवानगी दिली आहे. तथापि, उर्वरित मक्याचे काय करायचे असा संतप्त सवाल उत्पादकांनी विचारला आहे.

नाफेडकडून होणार केवळ एकरी बारा क्विंटल मक्याची खरेदी
सायखेडा : (बाजीराव कमानकर) व्यापारी वर्गाकडून भरड्या मालातील मक्याला कवडीमोल किंमत मिळत असल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने नाफेडच्या माध्यमातून एकरी बारा क्विंटल मका खरेदीला परवानगी दिली आहे. तथापि, उर्वरित मक्याचे काय करायचे असा संतप्त सवाल उत्पादकांनी विचारला आहे.
या संदर्भात बाजार समित्यांना पत्र प्राप्त झाले असून, निफाड खरेदी विक्री संघ लासलगाव बाजार समितीत १७६० रुपये दराने मका खरेदी करणार आहे. मका खरेदी करताना एका शेतकºयाची एकरी अवघी १२ क्विंटल मका खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे उर्वरित मकाचे करायचे काय असा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा राहिला उभा राहिला आहे.
केंद्र शासन आणि राज्य शासन शेतमालाचे उत्पादन दुप्पट करण्यासाठी सातत्याने घोषणा करीत आहे. यासाठी योग्य प्रकारे उपाययोजना केल्या जात आहेत. शासन एकीकडे उत्पादन दुप्पट करण्याच्या उपाययोजना राबविताना दिसते तर दुसरीकडे केवळ १२ क्विंटल मका खरेदी करीत आहे. शेतकºयांना एकरी साधारणत: ४० क्विंटल मक्याचे उत्पादन होत असते. बारा क्विंटल शासन खरेदी करणार असेल तर २८ क्विंटल मक्याचे करायचे काय? असा प्रश्न शेतकºयात उपस्थित होत आहे. शासन स्वत: इतकी कमी खरेदी करून उत्पादन दुप्पट करण्याच्या धोरणाला हरताळ फासण्याचे काम करीत आहे.
बाजार समित्यांमध्ये केवळ बाराशे ते तेराशे रुपये दर शेतकºयांना मिळत आहे. त्यांना कष्टाचे फळ मिळत नसल्याने फेडरेशनद्वारे मका खरेदी करण्याचा निर्णय शासनाने घेतला, मात्र एकरी १२ क्विंटल मका खरेदी करणार असल्याने उर्वरित २८ क्विंटल मक्याचे करायचे काय असा प्रश्न शेतकºयांना सतावत आहे; शासनाचे उत्पादनवाढीचे उद्दिष्ट दुप्पट असल्याने उत्पादन दुप्पट झाले आहे. अशा परिस्थितीत शासनाने सर्व मका खरेदी करावा अशी जोरदार मागणी होत आहे.
-----------------------------------
पोल्ट्री व्यवसाय धोक्यात
रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड केली जाते. शेतकºयांना चांगले उत्पादन मिळते. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आला आणि त्याचा परिणाम मक्याच्या बाजारभावावर झाला. त्यांचे प्रमुख खाद्य असणारा मका कवडीमोल दरात विकला जाऊ लागला.
-------------------------------
शासन एकीकडे शेतकºयांचे उत्पादन दुप्पट होण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे मक्याचे उत्पादन दुप्पट झाले. एकरी किमान ४० क्विंटल मक्याचे उत्पादन शेतात मिळते. शासन मात्र अवघे बारा क्विंटल मका खरेदी करणार आहे. उरणारा २८क्विंटल मका विकायचा कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने एकरी ४० क्विंटल मका खरेदी करण्याचे आदेश फेडरेशनला देऊन शेतकºयांना दिलासा द्यावा.
- विकास रायते, मका उत्पादक शेतकरी,
खडक माळेगाव