नगरसूल येथे आॅनलाइन सत्संग सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 18:42 IST2019-05-31T18:42:14+5:302019-05-31T18:42:30+5:30
नगरसूल येथे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज नाणिज संस्थेच्या वतीने अनोखा आॅनलाइन सत्संग सोहळा संपन्न झाला.

नगरसूल येथे आॅनलाइन सत्संग सोहळा
नगरसूल : येथे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज नाणिज संस्थेच्या वतीने अनोखा आॅनलाइन सत्संग सोहळा संपन्न झाला. येवला तालुक्यातील नगरसूल येथील बोरसे व फरताळे वस्तीवर, विज्ञानाच्या युगात सतसंघ तसाच झाला पाहिजे म्हणून विज्ञानाने केली क्र ांती, अध्यात्माशिवाय नाही मन:शांती, असा संदेश देणाऱ्या जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज यांचा आॅनलाइन सतसंघ संपन्न झाला.
सांप्रदायात मन अध्यात्मवादी ठेवा, डोळे विज्ञानवादी, बुद्धी वास्तववादाशी सांगड घालणारी ठेवा. सध्याचे युग स्पर्धात्मक असल्याने विज्ञानाच्या अधाराशिवाय तुम्ही विकसित होऊ शकणार नाही, असा संदेश जगतगुरु नरेंद्राचार्य महाराजांनी दिला असून, हाच संदेश घेऊन आज मी आॅनलाइन सतसंघ घेत आहे, असे नरेंद्राचार्य महाराज नाणिज पिठाच्या प्रवचनकार संध्या ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी सांगितले.
सोहळ्याला सरपंच प्रसाद पाटील, पंचायत समिती सदस्य
अॅड. मंगेश जाधव, विकास निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्तविक हरिभाऊ जाधव यांनी केले. अभार कोकणे यांनी मानले. यावेळी नगरसूल परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.