देवळा तालुक्यात कांद्याची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:58 IST2018-02-08T00:53:10+5:302018-02-08T00:58:40+5:30
देवळा : तालुक्यातील वरवंडी येथील पांडुरंग सुखदेव शिंदे यांच्या शेतातून चोरट्यांनी जवळपास २० ते २५ क्विंटल रांगडा लाल कांदा चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला असून, त्यामुळे शेतकºयांमध्ये खळबळ उडाली आहे.

देवळा तालुक्यात कांद्याची चोरी
देवळा : तालुक्यातील वरवंडी येथील पांडुरंग सुखदेव शिंदे यांच्या शेतातून चोरट्यांनी जवळपास २० ते २५ क्विंटल रांगडा लाल कांदा चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला असून, त्यामुळे शेतकºयांमध्ये खळबळ उडाली आहे.
निर्यातमूल्य शून्य होताच कांदा भावात वाढ होत असल्याने चोरीने शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी या चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून करण्यात येत आहे. देवळा तालुक्यातील वरवंडी येथील प्रगतिशील शेतकरी पांडुरंग सुखदेव शिंदे यांचा गावालगत मळा आहे. त्यांनी आपल्या शेतातील रांगडा लाल कांदा काढून शेतात एका ठिकाणी साठवून ठेवला होता. शिंदे बुधवारी बाजार समितीत सदर कांदे विक्रीसाठी घेऊन जाणार होते. आज सकाळी ते आपल्या शेतावर गेले असता त्यांना कांदा चोरट्यांनी भरून नेल्याचे समजताच त्यांनी ही माहिती गावातील पोलीसपाटलांना दिली.आजच्या बाजारभावानुसार शिंदे यांचा सुमारे ५० हजार रुपयांचा कांदा होता. या घटनेमुळे शेतकरीवर्ग भयभीत झाला असून, या घटनेचा पोलिसांनी छडा लावून कांदा चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. सध्या कांद्याला बºयापैकी बाजारभाव असल्याने शेतकºयांना दोन पैसे मिळत आहेत, त्यात अशी घटना घडत असेल तर त्यांनी न्याय कोणाकडे मागावा, अशी शेतकºयांची अवस्था झाली आहे.यात्रेनिमित्त उमराणा बाजार समिती बंदउमराणा : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने स्थानिक यात्रेनिमित्त मंगळवार, दि. १३ ते १५ फेब्रुवारीदरम्यान सलग तीन दिवस कांदा मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समिती संचालक मंडळाच्या व कांदा व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सभापती राजेंद्र देवरे, सचिव नितीन जाधव यांनी दिली.
उमराणा येथे महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा भरत असते. यानिमित्त कांदा मार्केट आठ दिवस बंद राहत होते. मात्र शेतकरी हिताचा निर्णय घेत फक्त तीन दिवस मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. तसेच भुसार मार्केटही (मका व इतर) दि. ९ ते १९ फेब्रुवारीदरम्यान बंद ठेवण्यात आले आहे. याची शेतकºयांनी नोंद घ्यावी. केवळ १० ते १२ आणि १६ ते १८ फेब्रुवारी रोजी कांदा मार्केट सुरू राहील व १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती असल्याने त्या दिवशीही मार्केट बंद राहील, अशी माहिती सभापती राजेंद्र देवरे, कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू देवरे, सचिव नितीन जाधव यांनी दिली.